Shriniwas Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shriniwas Patil : ऑनलाईन उपचाराची चिरफाड, आता औषधांची गरज; श्रीनिवास पाटील नेमके काय म्हणाले ?

उमेश भांबरे

Lok Sabha Session Update News : ग्रामीण भागातील रुग्णांना आजाराच्या निदानाचा ऑनलाईन सल्ला मिळतो, मात्र त्यांना घरपोच औषधे मिळत नाहीत. केंद्र सरकारच्या ‘ई संजीवनी’ योजनेच्याद्वारे अशा रुग्णांना घरपोच औषधे पुरवण्याची योजना दृष्टिक्षेपात आहे का? असा प्रश्न उपस्थित करून खासदार श्रीनिवास पाटलांनी ऑनलाईन उपचारांची चिरफाड केली. तसेच ही योजना जगवण्यासाठी ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना उपचारासाठी औषधांचा मोफत पुरवठा करवा लागेल, याकडे लक्ष वेधले.

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रामीण क्षेत्रात टेलिमेडिसिन सुविधेतील त्रुटींवर खासदार श्रीनिवास पाटलांनी (Shriniwas Patil) सरकारचे लक्ष वेधले. खासदार पाटलांनी, ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा रुग्णालयात जाऊन औषधे घेणे अवघड व अडचणीचे ठरत आहे. तर अनेकदा जिल्हा रुग्णालयात वेळेवर औषधे उपलब्ध होत नाहीत, असे सांगून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली.

केंद्र सरकारने दुर्गम भागातील रुग्णांच्या आजाराच्या निदासाठी टेलिमेडिसिन ही ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. याद्वारे आजाराचे निदान झाल्यावर संबंधित रुग्णाला त्याच्या गावात मोफत औषधे उपलब्ध करून द्यावीत. यासाठी सरकारने काही योजना आखली आहे काय ? नसेल तर तशी योजना करावी, अशी मागणी त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाटलांच्या प्रश्नाला आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय (Mansukh Mandviy) यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, भारत सरकारच्या वतीने नॅशनल हेल्थ मिशन योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत या योजनेतून नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. टेलिकन्सल्टेशनमुळे गरीब आणि दुर्गम भागातील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे दररोजच्या टेलिकन्सल्टेशनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सामान्य नागरिकांच्या उपचारासाठी ते फायदेशीर ठरु लागले आहे, असेही मांडवीय यांनी स्पष्ट केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT