Siddharam Mhetre-Sachin Kalyanshetti-Sidramappa Patil
Siddharam Mhetre-Sachin Kalyanshetti-Sidramappa Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Akkalkot Bazar Samiti : पाटील-कल्याणशेट्टी जोडीला म्हेत्रेंचे आव्हान; ‘गोल्डन गॅंग, भस्मासूर, उचल्या गॅंग’; प्रचारात शेलक्या शब्दांचा वापर

सरकारनामा ब्यूरो

अक्कलकोट : अक्कलकोट (Akkalkot) कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी (Bazar Samiti) दाखल एकूण १०४ अर्जांपैकी ५६ लोकांनी माघार घेतल्याने १८ जागांसाठी ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (Siddramappa Patil) आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांच्या विरोधात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांच्या पाठिंब्याने सर्वपक्षीय आघाडी यांच्यात राजकीय संघर्ष होणार आहे. (Siddharam Mhetre challenge to Siddramappa Patil- Sachin Kalyanshetti in Akkalkot)

बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पॅनेलमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. गोल्डन गॅंग, भस्मासूर, उचल्या गॅंग अशा शेलक्या शब्दांचा वापर करीत दोन्हीकडील नेतेमंडळी करीत असल्याने ही निवडणूक प्रचंड चुरशीची व राजकीय संघर्षाची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आणि माजी सभापती संजीव पाटील यांना आमदार सचिन कल्याणशेट्टी भक्कम पाठबळ देत आहेत.

विरोधातील सर्वपक्षीय आघाडीमध्ये माजी सभापती व काँग्रेस नेते मल्लिकार्जुन पाटील, भाजपचे आनंद तानवडे, राष्ट्रवादीचे दिलीप सिद्धे, गोकुळ शुगरचे दत्ता शिंदे व कपिल शिंदे, जनसेवा संघटनेचे तुकाराम बिराजदार व शिवसेना (शिंदे गटाचे) तालुकाप्रमुख संजय देशमुख आदींचा समावेश आहे. या सर्वपक्षीय नेतेमंडळीच्या आघाडीला माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची भक्कम साथ आहे.

अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीसाठी संजीव पाटील विरोधात मल्लिकार्जुन पाटील असे चित्र जरी निर्माण झालेले असले तरी खरी लढत माजी आमदार सिद्रामप्पा पाटील-आमदार सचिन कल्याणशेट्टी या युतीच्या विरोधात माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे अशीच आहे. माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह सर्वपक्षीय आघाडीची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे.

माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी नुकतेच स्वामी समर्थ साखर कारखान्याच्या सहा जागेसाठी लागलेल्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढलेल्या शक्तीची ही लीटमस चाचणी ठरू शकते. काही अपक्ष आपले नशीब आजमावत आहेत. मतदार राजा कोणाच्या पारड्यात वजन टाकतो व कोणाला विजयी करतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

सहकारी संस्था मतदार संघातील एकूण ११ जागांसाठी प्रवर्गानुसार उमदेवार पुढीलप्रमाणे आहेत. सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ-बाबूराव सिद्धाप्पा करपे, सुरेश भिमशा गड्डी, बसवराज शरणप्पा तानवडे, आप्पासाहेब बसवनाप्पा पाटील, मल्लिकार्जुन महादेव पाटील, संजीव सिद्रामप्पा पाटील, सिद्रामप्पा मलकप्पा पाटील, कामगौडा संगणबसप्पा बाके, धनराज चंद्रकांत बिराजदार, सुमित तुकाराम बिराजदार, रविकिरण श्रीशैल वरनाळे, विठ्ठल नीलप्पा विजापुरे, कपिल बलभीम शिंदे,महांतेश लक्ष्मण हत्तुरे, चनमलप्पा सिद्रामप्पा हालोळे.

सहकारी संस्था सर्वसाधारण महिला राखीव : विठाबाई शेकप्पा कलगुटगे, शकुंतला बाजीराव खरात, शिवमंगल धोंडप्पा बिराजदार, सुवर्णा गुरुनिंगप्पा मलगोंडा, पार्वतीबाई इराप्पा स्वामी. सहकारी संस्था इतर मागासवर्गीय : अश्फाक गुडुमिया अगसापुरे, प्रकाश भीमराव कुंभार. सहकारी संस्था विमुक्त जाती व भटक्या जमाती : राजेंद्र धूळप्पा बंदीछोडे, शिवयोगी सिद्धप्पा पुजारी.

ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार जागांसाठी खालील प्रमाणे उमेदवार : ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ- मल्लिनाथ पंडित ढब्बे, कार्तिक बळीराम पाटील, आदित्य सुनील बिराजदार, रेवनप्पा बसवनाप्पा मडीखंबे, शिवयोगी कामन्ना लाळसंगी, निरंजन बसवंतप्पा हेगडे. ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ-यशवंत खंडू इंगळे, राहुल सिद्राम रूही, सिद्धार्थ रघुनाथ गायकवाड.

ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघ-लक्ष्मीबाई शिवशरण पोमाजी, प्रकाश सिद्धाराम बिराजदार. अडते व व्यापारी मतदारसंघ- विजयकुमार शिवशरणप्पा कापसे, श्रीशैल स्वामीराव घिवारे, बसवराज शंकर माशाळे, शंकर बसवराज माशाळे, महम्मदहुसेन अ.गफूर शेरीकर. हमाल व तोलार मतदारसंघ- उमेश आमसिद्ध गायकवाड, यल्लाप्पा गुरप्पा ग्वाल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT