भोर (जि. पुणे) : भोर (Bhor) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीत कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटेंच्या (Sangram Thopte) विरोधात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने युतीच्या माध्यमातून आव्हान दिले आहे. मात्र, काँग्रेसने चार जागा बिनविरोध करत विजयी सलामी दिली आहे. उर्वरीत १४ जागांसाठी थोपटेंच्या राजगड कषी विकास पॅनेलच्या विरोधात राष्ट्रवादी, भाजप, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. (Both Shiv Sena, BJP and NCP are united against MLA Sangram Thopte)
दरम्यान, भोर बाजार समितीच्या निवडणुकीत राजगड कृषी विकास पॅनेल सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. येथील रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या कार्यालयात आमदार संग्राम थोपटे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या राजगड कृषी विकास पॅनेलच्या १४ उमेदवारांची घोषणा केली.
काँग्रेसचे चार उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये व्यापारी व आडते मतदारसंघातील राजेंद्र दिनकर शेटे(उत्रौली) व नवनाथ विठ्ठल भिलारे(किकवी), अनुसूचीत जाती जमाती मतदारसंघातील दिपक दिनकर गायकवाड (महुडे खुर्द) आणि हमाल तोलारी मतदारसंघीतील विनोद गुलाब खुटवड (नांदगाव) आदींचा समावेश आहे.
बाजार समितीच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला संपूर्ण जागांवर उमेदवार मिळाले नसल्याने त्यांनी भाजप, शिवसेना व शिवसेना ठाकरे गटाबरोबर दळभद्री युती करावी लागली. ही गोष्ट भोरची जनता कधीच मान्य करणार नाही. यामुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, पोपट सुके, विकास कोंडे, शिवाजी कोंडे, के.डी. सोनवणे, सोमनाथ सोमानी, उत्तम थोपटें, महेश टापरे, विठ्ठल आवाळे, रोहन बाठे, सुभाष कोंढाळकर, अशोक शेलार, दिनकर धरपाळे आदींसह सर्व उमेदवार उपस्थित होते.
भोर तालुक्यातील सहकारील खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राजगड सहकारी साखर कारखाना या संस्थांची स्थापना ही माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या विचार धारेनेनुसार केली. विरोधकाचे यामध्ये कोणतेही सहकार्य नसताना केवळ आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व आपले अस्तित्व दाखवण्यासाठी व आपल्या पक्षातील वरीष्ठांना खूश करण्यासाठी व्यक्तीव्देषातून आमच्यावर आरोप करीत आहेत, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
राजगड कृषी विकास पॅनलचे उमेदवार
सर्वसाधारण सात जागा - आनंदा बाबुराव आंबवले ( कर्नावड ), धनंजय कृष्णा वाडकर( ससेवाडी), अंकुश पांडुरंग खंडाळे (येवली), राजाराम बाबुराव तुपे (वरोडी बुद्रुक), निलेश बबन सोनवणे (न्हावी), सुरेश राघू राजिवडे (म्हसर बुद्रुक) व भाऊ चंदर मळेकर (मळे). महिला प्रतिनिधी दोन जागा - अनिता दत्तात्रय गावडे (भोलावडे) व सुरेखा रमेश कोंडे (केळवडे). इतर मागास एक जागा - ईश्वर बबन पांगारे (वेळू). भटक्या विमुक्त एक जागा - विठ्ठल धोंडीबा गोरे (डेहन). ग्रामपंचायत सर्वसाधारण दोन जागा - महेश अशोक धाडवे (सारोळा) व प्रविण विष्णु शिंदे (वेनवडी). आर्थिक दुर्बल घटक एक जागा - शहाजी दिलीप बोरगे (करंदी खेबा).
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.