Solapur, Barshi Bazar Samiti Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : विधानसभेपूर्वी भाजपपुढे आणखी एक कठीण पेपर; सोलापूर, बार्शी बाजार समितीची निवडणूक जाहीर होणार

Bazar Samiti Election : सोलापूर बाजार समितीत मागील निवडणुकीप्रमाणे देशमुख विरोध देशमुख लढत होणार की, महायुतीचे सर्व नेते एकत्र येऊन भाजपला आव्हान देणार हे पाहावे लागेल.

प्रमोद बोडके

Solapur, 30 June : सोलापूर जिल्ह्यातील महत्वाची सत्ताकेंद्र असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. कारण, या दोन्ही बाजार समितीच्या प्रारूप मतदार याद्या सोमवारी (ता. 1 जुलै) प्रसिद्ध होणार आहेत. सोलापूर बाजार समितीसाठी 5 हजार 470, तर बार्शीसाठी 5 हजार 461मतदार असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोलापूर (Solapur) बाजार समितीत (Bazar Samati) मागील निवडणुकीप्रमाणे देशमुख (Subhash Deshmukh) विरोध देशमुख (Vijaykumar Deshmukh) लढत होणार की महायुतीचे सर्व नेते एकत्र येऊन भाजपला आव्हान देणार हे पाहावे लागेल. बार्शी बाजार समितीत मात्र माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्या विरोधात आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या पॅनेलचा पुन्हा सामना होण्याची शक्यता आहे.

सोलापूर आणि बार्शी या दोन्ही बाजार समितींवर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचेच वर्चस्व राहिलेले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला, त्यानंतर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 2018 च्या निवडणुकीत सत्ता बदल झाला. तोपर्यंत बार्शी बाजार समितीवर माजी मंत्री दिलीप सोपल यांची एकहाती सत्ता होती. भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी 2018 मध्ये प्रथमच बार्शी बाजार समितीवर आपला झेंडा रोवला.

सोलापूर बाजार समितीच्या मागील निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शिवसेना नेत्याच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आघाडीच्या विरोधात तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलमध्ये लढत झाली होती. त्यात सर्वपक्षीय पॅनेलाचा एकहाती विजय झाला होता.

पहिली साधारण दोन वर्षे बाजार समितीच्या सभापतिपदी माजी आमदार दिलीप माने यांची वर्णी लागली होती. त्यानंतर मात्र विजयकुमार देशमुख यांच्याकडे हे पद आले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते सर्वार्थाने ताकदवान असणारे पद सांभाळत आहेत. त्यासाठी देशमुखांनी संचालकांनाही त्याच पद्धतीने आपलेसे केले आहे.

लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यातच बाजार समितीसाठी पुन्हा जुनी पद्धत लागू करण्यात आली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आता ग्रामपंचायत आणि सोसायटी मतदारसंघात असणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या विशेषतः भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीप्रमाणे कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.

सोलापूर बाजार समितीचे अंदाजे मतदार

विकास कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघ

  • सोलापूर शहर : 193

  • दक्षिण सोलापूर : 1039

  • उत्तर सोलापूर : 663

  • एकूण : 1895

    ग्रामपंचायत सदस्य मतदार संघ

  • दक्षिण सोलापूर : 844

  • उत्तर सोलापूर : 370

  • एकूण : 1214

    व्यापारी मतदार संघ : 1276

    हमाल तोलार मतदार संघ : 1085

    एकूण एकंदर : 5470

बार्शीचे अंदाजे मतदार

  • विकास कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघ : 1661

  • ग्रामपंचायत सदस्य मतदार संघ : 1056

  • व्यापारी मतदार संघ : 1723

  • हमाल तोलार मतदार संघ : 1021

  • एकूण एकंदर : 5461

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT