Solapur School Principal Death  
पश्चिम महाराष्ट्र

School Principal Death: मुख्याध्यापकानं पत्नी अन् दोन मुलांसह जीवन संपवलं; शेअर मार्केटमुळं संपलं अख्ख कुटुंब

School Principal Death: शेअर मार्केटमधील धोक्याचा विचार न करताच अनेक जणांना इथं पैसे गुंतवण्याचं अक्षरशः व्यसनच जडलं आहे.

Amit Ujagare

School Principal Death: जोखमीचा फारसा विचार न करता मोठ्या परताव्याच्या हव्यासापोटी आजकाल शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्याला प्राध्यान्य दिलं जातं. यातील धोक्याचा विचार न करताच अनेक जणांना इथं पैसे गुंतवण्याचं अक्षरशः व्यसनच जडलं आहे. शेअर मार्केट हा एक प्रकारचा जुगारच आहे, पण याची जाण नसल्यानं अनेकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. त्यातून मग बऱ्याचदा गुंतवणूकदार टोकाचे निर्णय घेतात, असाच एक प्रकार सोलापुरात घडला आहे. एका मुख्याध्यापकावर कुटुंबासह जीवन संपवण्याची वेळ आली, यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

सोलापुरातील बार्शीतील एका मुख्याध्यापकानं आपली पत्नी अन् दोन मुलांसह जीवन संपवलं. यामागचं कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल, कारण एकतर समाजातील अत्यंत समजदार आणि सुशिक्षित व्यक्ती म्हणून शिक्षक वर्गाकडं पाहिलं जातं. त्यात मुख्याध्यापक ही तर अत्यंत जाणती आणि आदरणीय व्यक्ती. पण बार्शीतल्या या मुख्याध्यापकांना शेअर बाजारातील गुंतवणूक चांगलीच महागात पडली म्हणजे अक्षरशः जीवघेणीच ठरली.

शेअर मार्केटमध्ये या मुख्याध्यापकांनी मोठी गुंतवणूक केली होती, पण यामध्ये त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या आर्थिक नुकसानीपोटी त्यांच्या तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांचं कर्ज झालं. इतकी प्रचंड कर्जाची रक्कम एका सर्वसामान्य मुख्याध्यापक असलेल्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला फेडता येणं केवळ अशक्य झालं होतं. या कर्जाला कंटाळल्यानं आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून या मुख्याध्यापकानं या कटकटीतून कायमचं मुक्त होण्यासाठी म्हणून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, जीवन संपवल्यानंतर केवळ स्वतःच या कर्जातून मुक्त होऊ पण त्याचा भार आपल्यामागे पत्नी अन् दोन मुलांनाही सहन करावा लागेल, या चिंतेतून मग त्यानं स्वतःसह पत्नी अन् दोन मुलांसह आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारणं समोर आल्यानंतर अनेकांना धक्काच बसल्याचं सुत्रांकडून कळतं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT