

Tukaram Mundhe action against gutkha trade: IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांची वारंवार बदली झाली तरी देखील त्यांच्या कामाची शैली बदललेली नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ते कठोर कारवाई करतात. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर तेथे देखील त्यांचा कारवाईचा धडाका सुरूच आहे.
अवघ्या एका आठड्यात एफडीएकडून 103 ठिकाणी छापे मारण्यात आली असून तब्बल 102 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या या कारवायांमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईमध्ये तब्बल 86 दुकाने सील करण्यात आली असून 34 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोकण विभागात 46 आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबईत 22 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये २३ जणांना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव, खेड तालुक्यात 5 ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त करण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यात मंचर येथे साईराज पान अँड टी हाऊस व समीक्षा कोल्ड्रिक जनरल अॅड किराणा स्टोअर यांच्या पाठीमागील छोट्या गोदामामध्ये दोन ठिकाणी ३० हजार ३९५ रुपयाचा गुटखा, पानमसाला व इतर तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करत असल्याचे आढळून आले. संबंधितावर भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नुसार पोलीस स्टेशन, मंचर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भेसळयुक्त, बेकायदेशीर अन्न उत्पादन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मोहिम आणखी तीव्र होणार असल्याची माहिती आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां संस्था, दुकाने आणि अस्थापनांच्याबाबत नागरिकानी माहिती प्रशासनास उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.