Sanskruti Satpute-Amruta waghe- Ramappa chivadshetti-Chetansinh kedar sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur ZP Sabhapati : सोलापूर झेडपीचे सभापती जाहीर : सातपुते, चिवडशेट्टी, वाघे, केदार-सावंत यांना लॉटरी

Solapur Zilla Parishad sabhapati list 2026 : सभापतिपदाच्या निवड अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याप्रमाणे सव्वा वर्षासाठी असणार की अडीच वर्षांसाठी याची उत्सुकता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 27 March (विठ्ठल सुतार) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित विषय समित्यांच्या सभापतींची नावे भारतीय जनता पक्षाने आज (ता. 27 मार्च) जाहीर केली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्याकडे अर्थ व बांधकाम, माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांच्याकडे समाज कल्याण, दक्षिण सोलापूरचे रामप्पा चिवडशेट्टी यांना कृषी व पशुसंवर्धन, तर माढ्यातील अमृता वाघे यांना महिला व बाल कल्याण सभातिपदी संधी दिली आहे. जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापतिपद सोपविण्यात आले.

आमदार, माजी आमदार आणि वरिष्ठांशी चर्चा करून पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सभापतींच्या नावांची घोषणा केली आहे. ही निवड अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याप्रमाणे सव्वा वर्षासाठी असणार की अडीच वर्षासाठी याची उत्सुकता आहे. या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे.

सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाने प्रथमच ६८ पैकी ३८ जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळविले होते. भाजपचा पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून बार्शीच्या दीपक वैद्य यांना संधी देण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपद हे उत्तर सोलापूर तालुक्यातील इंद्रजीत पवार यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे. त्यामुळे आता सभापतिपदाची उत्सुकता होती.

जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापतिपद हे पारंपारिक पद्धतीनुसार उपाध्यक्षांकडे जाते, त्यामुळे इंद्रजीत पवार यांच्याकडे अर्थ व बांधकाम समितीचे सभापतिपद गेले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले रामप्पा चिवडशेट्टी यांना कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतिपदाची संधी देण्यात आली आहे. ते अध्यक्षपदासाठी इच्छूक होते. मात्र, आता सभापतिपद मिळाल्याने त्यांची अध्यक्षपदाची दावेदारी संपल्यात जमा आहे.

माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांच्याकडे समाज कल्याण समितीची धुरा देण्यात आली आहे. त्या माळशिरसमधील दहिगाव गटातून निवडून आलेल्या आहेत.

तसेच, पत्नीला सभापती करून राम सातपुते यांनी सतेच्या माध्यमातून तालुक्यातील लोकांशी कनेक्ट राहील, याची काळजी घेतल्याचे दिसून येते. मोहिते पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीपासून टोकाचा विरोध करणाऱ्या सातपुते यांच्या पाठीशी सभापतिपदाच्या माध्यमातून सत्तेचे पाठबळ देण्याचा प्रयत्न पालकमंत्री गोरे यांनी केला आहे.

माढा तालुक्यातील टेंभुर्णी गटातून विजयी झालेल्या ॲड अमृता नागनाथ वाघे यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद देण्यात आलेले आहे, त्यामुळे विधानसभेपासून बॅकफूटवर गेलेल्या माजी आमदार बबनराव शिंदे गटाला सत्तेची ऊर्जा मिळाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनाही सभापतिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापतिपद सोपविण्यात आलेले आहे. एकंदरीतच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे धाराशिव लोकसभा मतदारसंघात, उपाध्यक्षपद हे सोलापूर, तर तीन महत्वाची सभापतिपदे ही माढा लोकसभा मतदारसंघात गेली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT