NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील चौथी विकेट जाणार, मोठ्या मंत्र्यावर राजीनाम्यासाठी दबाव? सुनेत्रा पवारांच्या निर्णयाकडे लक्ष!

Narhari Zirwal Sunetra Pawar : धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि रुपाली चाकणकर यांच्यानंतर राष्ट्रवादीमधील एका मोठ्या मंत्रावर राजीनाम्यासाठी दबाव आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawarsarkarnama
Published on
Updated on

Narhari Zirwal News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे या मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर नुकताच रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या तीन राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीमधील आणखी एका मोठा मंत्री अडचणीत असून त्याच्यावर देखील राजीनाम्यासाठी दबाव आहे.

मंत्री नरहरी झिरवळ यांचा तृतियपंथीयासोबतचा खासगी व्हिडिओ समोर आला. त्यानंतर झिरवळ हे मागील दोन दिवसांपासून नाॅट रिचेबल आहेत. शासकीय निवास्थानाचा गैरवापर करत त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप विरोधकांकडून करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

झिरवळ यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याचे राष्ट्रवादीची अंतर्गत कुजबूज सुरू आहे. त्यामुळे झिरवळ यांच्या राजीनाम्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा हिरवा झेंडा आहे. मात्र, अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या घेणार आहेत.

Sunetra Pawar
तृतीयपंथीयांसोबत अश्लील व्हिडिओ, नरहरी झिरवळ अडचणीत? Narhari Zirwal Viral Full Video, Today News

तृतियपंथीयाकडून झिरवळ यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली नाही. तिच्या भावाकडून हा व्हिडिओ समोर आणण्यात आला आहे. या माध्यमातून झिरवळ यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेत याविषयी माहिती दिली होती. त्यामुळे झिरवळ यांना दिलास मिळणार की राजीनामा द्यावा लागणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

धनंजय मुंडें पुन्हा मंत्रिमंडळात?

झिरवळ यांचा व्हिडिओ बाहेर काढण्यामागे माजी मंत्री असल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांनी मंत्र्याचे नाव घेतले नसले तरी झिरवळ यांनी राजीनामा दिला तर धनंजय मुंडे हे पुन्हा मंत्रिमंडळात येतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांचा इशारा मुंडेंकडे असल्याची दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Sunetra Pawar
Narhari Zirwal Video Viral : व्हायरल व्हिडीओनंतर नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत : हर्षवर्धन सपकाळांकडून राजीनाम्याची मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com