Devendra Fadnavis-Devendra Kothe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Devendra Kothe : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गाडीचे स्टेअरिंग आमदार देवेंद्र कोठेंच्या हाती

Devendra Fadnavis Solapur Tour : सोलापूर दौऱ्यात सत्कारानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाडीचे सारथ्य केले. या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 28 April : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौऱ्यात एका गोष्टीची चर्चा होताना दिसत आहे. कृतज्ञता सोहळा आणि सत्कार समारंभानंतर विमानतळाकडे जातात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाडीचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सारथ्य केले. सोलापूर शहरात त्याची चर्चा रंगली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. या यशाबद्दल जिल्ह्यातील जनतेबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते.

देवेंद्र कोठे (Devendra Kothe) हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे युवा आमदार आहेत. भारतीय जनता पक्षात त्यांनी अल्पावधीतच बस्तान बसविले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भक्कम पाठबळ आमदार कोठे यांच्या पाठीशी असते.

महापालिका निवडणुकीत कोठे-गोरे जोडीने कमाल केल्याचे दिसून आले. त्यातूनच सोलापूरच्या महापौरपदाची माळ कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल यांच्या गळ्यात पडली आहे. कोठे परिवाराचे यापूर्वी सोलापूर महापालिकेवर वर्चस्व राहिले आहे, त्यानंतर भाजपमध्ये आल्यानंतरही देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेचे सत्ताकेंद्र आपल्याच हाती राखण्यात यश मिळविले आहे.

देवेंद्र कोठे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही मर्जीतील आमदार म्हणून ओळखले जातात. फडणवीस राज्याच्या राजकारणात तरुण आमदारांची फळी उभी केली आहे, त्यात सोलापूरचे देवेंद्र कोठे यांचा नंबर वरचा आहे, त्यामुळे आमदार कोठे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत निकटचे संबंध आहेत.

सोलापुरातील सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर विमानतळाकडे निघालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचे स्टेअरिंग आमदार देवेंद्र कोठे यांच्या हाती होते. प्रोटोकॉल पाळून आमदार कोठे यांनी स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री फडणवीस यांना विमानतळावर पोचवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT