Maratha Kranti Morcha
Maratha Kranti Morcha sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती थांबवा... मराठा मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

हेमंत पवार

कऱ्हाड : मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सुटेपर्यंत सर्व प्रकारची शासकीय नोकरभरती थांबवावी, अशी मागणी कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात त्याची कार्यवाही न झाल्यास १० ऑक्टोंबरपासुन बेमुदत उपोषण करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला.

याबाबतचे निवेदन कराड मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तहसीलदार विजय पवार यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी की, ओबीसी राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत राज्यातल्या सर्वप्रकारच्या निवडणूका बेमुदत पुढे ढकलण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत आहोत. ओबीसी बांधवांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ नये या काळजीपोटी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल सरकारचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील यांनी 1982 ला मंत्रालयावर पहिला मोर्चा काढला. त्यावेळपासुन आत्तापर्यत मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारं 50 टक्के मर्यादेत व ओबीसी प्रवर्गातून संविधानिक आरक्षण मिळू शकलेले नाही. यामुळे मराठा समाजातल्या अनेक गुणवंतांना शैक्षणिक व नोकऱ्यातील संधीपासून वंचीत रहावे लागले आहे. हा खूप मोठ्ठा अन्याय मराठा समाजावर 40 वर्षांपासून होत आहे.

2018 साली विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सत्ताकाळात गठीत वैधानिक गायकवाड आयोगाच्या सर्वेक्षण व अहवालानुसार मराठा समाजाला 50 टक्के मर्यादेत व ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देशांकडे दुर्लक्ष करण्यात आले. तत्कालीन सरकारने मराठा समाजाला 50 टक्के बाहेरील आरक्षण लागू केले, जे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडून विरोध नसतना देखिल मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण मिळू शकलेले नाही. मराठा समाजावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत सर्वप्रकारच्या शासकीय नोकरभरती पुढे ढकलण्यात यावी. महिनाभरात गायकवाड आयोगाच्या शिफारसीनुसार मराठा समाजाला 50 टक्के मर्यादेत व ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण लागू करावे. अन्यथा १० ऑक्टोंबरपासून कऱ्हाडला बेमुदत साखळी उपोषण केले जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT