Solapur BJP Meeting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur BJP Meeting : सोलापूर लोकसभेतील पराभवाच्या चिंतनाला दोन्ही देशमुखांसह आवताडेंची दांडी...

Vijaykumar &Subhash Deshmukh, Samadhan Autade Absent BJP Meeting : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या पराभवाच्या चिंतन बैठकीला सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख गैरहजर होते

Vijaykumar Dudhale

Solapur, 22 June : सोलापूर लोकसभा मदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या पराभावाचे चिंतन करण्यासाठी पक्षाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही चिंतन बैठक भाजपचे राज्यसभेचे खासदार तथा सोलापूरचे निरीक्षक धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती. मात्र, या महत्वपूर्ण बैठकीला भाजपचे आमदार तथा माजी मंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार समाधान आवताडे आणि खुद्द उमेदवार राम सातपुतेही अनुपस्थित होते, त्यामुळे दोन्ही देशमुखांच्या गैरहजेरीची सोलापूरमध्ये चर्चा रंगली आहे.

आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याकडून सुमारे ७४ हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. त्या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी सोलापूरचे निरीक्षक खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या उपस्थितीत चिंतन बैठक बोलावण्यात आली होती.

चिंतन बैठकीला सोलापूरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी वगळता विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोन्ही आमदारांनी दांडी मारली होती. बैठकीला जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, विक्रम देशमुख, मनीष देशमुख यांच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, दोन्ही आमदार गैरहजर राहिल्याने त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली होती.

गेली दोन लोकसभा निवडणुकीत बाजी मारलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजप उमदेवाराचा पराभव काय झाला, याची माहिती घेण्यासाठी बोलावली होती. मात्र, या बैठकीत भाजप पदाधिकारी यांनी पक्षाचे निरीक्षक तथा खासदार धनंजय महाडिक यांना त्यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याच्या संचालकांनी प्रणिती शिंदे यांना मदत केल्याबद्दल जाब विचारल्याने गोंधळ झाला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी आपले म्हणणे सादर केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक बोलायला उभे राहिले, त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा मुद्दा मांडला. कारखान्याच्या काही संचालकांनी प्रणिती शिंदेंना पाठिंबा का दिला, असा सवाल कार्यकर्त्यांनी महाडिकांना विचारला. जिल्हाध्यक्ष कल्याणशेट्टी यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत राहण्याची सूचना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT