Udhav Thackeray, Sudhir Mungantiwar, Rahul Gandhi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali BJP News : राम मंदिर नको, शौचालय बांधा म्हणणार्‍या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेलेत... सुधीर मुनगंटीवारांची जहरी टीका

Umesh Bambare-Patil

Sangali BJP News : काँग्रेसची दिशा भरकटली आहे. प्रभु रामचंद्राच्या जागेवर शौचालय बांधा म्हणणार्‍या काँग्रेससोबत हिंदुत्वाचा गाजवावा करणारे उद्धव ठाकरे गेले आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्याकडून चांगले बोलण्याची अपेक्षा करु नये, असा उपरोधिक टोला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगलीत लगावला. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी नष्ट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सांगलीत 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ वन व सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जी काँग्रेस Congress रामायण हे काल्पनिक असल्याचे सांगत होती. राम मंदिर जागेवर शौचालय बांधावे, असे काँग्रेसकडून सांगितले जात होते.

अशा विचारांच्या पक्षासोबत हिंदुत्वाचा गाजवावा करणारे उद्धव ठाकरे बसले आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्याकडून हिंदुत्वाचे विचार सोडा पण चांगल्या बोलण्याची अपेक्षाही करु नये. मंत्री मुनगंटीवार म्हणाले, जानेवारीत सरकार पडणार या विधानावरून महाविकास आघाडीवर टीका केली.

'लांडगा आला रे आला' म्हणणार्‍या व्यक्तीचा आणि महाविकास आघाडीचा डीएनए समान आहे. दर महिन्याला सरकार पडणार असे म्हणतात. आता 10 जानेवारी म्हणत आहेत, पण 10 जानेवारीनंतर ही सरकार पडणार नाही. पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असे पडले की पुन्हा उभे राहण्याच्या पात्रतेचे राहणार नाही.

संजय राऊतांची मोदींना मदत...

राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार सांगणे म्हणजे, संजय राऊत हे नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष मदत करत आहेत. राहुल गांधी पंतप्रधान होणार म्हटले की, मतदान भाजपला जाते. ममता बॅनर्जी यांना हे कळले आहे. त्यामुळे त्या राहुल गांधी यांच्या मागे गेल्या नाहीत, असेही मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

सुप्रियाताईंची मतदारसंघात गडबड मग, नेतृत्वाचे काय?

खासदार सुप्रिया सुळे यांना बारामतीत धोका असल्याचे त्यांना कळले आहे. जान बची तो, लाखो पाये. मतदारसंघात गडबड झाली तर देशाचे नेतृत्व कसं करणार? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. त्यामुळे मतदारसंघात थांबण्यासाठी सुळे यांना खूप शुभेच्छा आहेत. आम्ही बारामती लोकसभा जिंकू त्यावेळी खूप कमी अंतर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT