Sudhir Mungantiwar-Makrand Patil-Babasaheb Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊ आपल्याच सरकारच्या मंत्र्यांवर संतापले; म्हणाले ‘उत्तर मागे घ्या; अन्यथा हक्कभंग आणेन’

Maharashtra Budget Session 2025 : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात 2018 मध्ये उभारण्यात आलेल्या चारा छावणी चालकांचे अनुदान अजूनही देण्यात आलेले नाही. कर्ज काढून, दागदागिने गहान ठेवून चालकांनी या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 06 March : सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रलंबित चारा छावणी अनुदानाचा प्रश्न आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित आज विधासनसभेत उपस्थित केला. तसेच, चारा छावणी चालकांचे अनुदान व्याजासह देणार का? असा प्रश्न मंत्र्यांना विचारला. त्यावर तशी तरतूद नसल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले. त्यावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत एका कॉन्ट्रक्टरला अडीच कोटीचे 513 कोटी देता आणि शेतकऱ्यांना व्याजासह मदत का देत नाही म्हणत मंत्र्यांनी आपले उत्तर मागे घ्यावे अन्यथा मी मंत्र्यांवर हक्कभंग आणेन, असा इशारा दिला.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) म्हणाले, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात 2018 मध्ये उभारण्यात आलेल्या चारा छावणी चालकांचे अनुदान अजूनही देण्यात आलेले नाही. कर्ज काढून, दागदागिने गहान ठेवून चालकांनी या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यांचे अनुदान प्रलंबित आहे, त्यामुळे चालकांमध्ये असंतोष आहे. सांगोला आणि मंंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांना किती दिवसांत अनुदान मिळणार? आणि ते व्याजासह मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला.

त्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील (Makrand Jadhav Patil) यांनी मुळात शासकीय देणी ही व्याजासह देण्याची तरतूद नाही, त्यामुळे ही देणी आपण व्याजासह देऊ शकत नाही, असे उत्तर दिले.

मंत्री मकरंद पाटील यांच्या उत्तरावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माझा मंत्र्यांच्या एका वाक्यावर आक्षेप आहे, पाहिजे तर मी एक कागद देतो, असे सांगितले. सरकारची देणी व्याजासह देण्याची तरतूद नाही, असं सांगता. मग चंद्रपूरच्या एका प्रकरणात अडीच कोटी रुपये द्यायचे असताना ५१३ कोटी रुपये देण्यात आले. पुढच्या आठवड्यात मी ते सभागृहात मांडणार आहे आणि तुम्ही म्हणता व्याजासह देण्याची तरतूद नाही.

ते म्हणाले, तुम्ही एका ठेकेदाराला अडीच कोटीचे ५१३ कोटी रुपये देता आणि शेतकऱ्यांना व्याज देऊ शकत नाही. मी सरकारचा एक कागद देतो. त्यामुळे मंत्र्यांनी आपले उत्तर दुरुस्त करावे; अन्यथा मंत्री महोदयांवर मी हक्कभंग आणेन. मंत्र्यांनी आपले उत्तर दुरुस्त करावे. ही सरकारची टिपण्णी आहे. अडीच कोटी संदर्भात प्रकरण कोर्टात गेलं आणि सरकारने ५१३ कोटी रुपये दिले. त्यावर आक्षेप घेतला तरी एक ते दीड वर्षापासून फाईल प्रलंबित आहे. म्हणून मंत्र्यांनी आपले उत्तर दुरुस्त करावे.

देणी व्याजासह देता येत नाही म्हणजे काय? व्याजासह का नाही द्यायची? शेतकऱ्यांची, गरिबांची आहेत म्हणून? ठेकेदाराची ५१३ कोटी रुपये देता येतात, हे उत्तर चुकीचे आहे. त्यामुळे मंत्र्यांनी दुरुस्त करावे; अन्यथा चुकीच्या उत्तराबद्दल हक्कभंग आणण्यात येईल, असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला. मुनगंटीवार यांच्या इशाऱ्यनंतर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ‘तपासून दुरुस्ती करण्यात येईल’ असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT