Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai : मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेशावेळी शंभूराज देसाईंना अश्रू अनावर, हमसून हमसून रडले; काय आहेत आठवणी!

Meghdoot Bungalow : मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेशाच्या वेळी शंभूराज देसाई यांच्या मातोश्री यांनी शंभूराज यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. तसेच, शंभूराज देसाई यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध राजकारणात आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 03 August : पर्यटन आणि खणीकर्म मंत्री शंभूराज देसाई यांना मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेशावेळी अश्रू अनावर झाले. तब्बल 55 वर्षांनंतर देसाई कुटुंबीयांनी मेघदूत बंगल्यात प्रवेश केला आहे. ज्या बंगल्यात जन्म झाला, बालपण गेले, तोच बंगला शंभूराज देसाई यांना मिळाला आहे. आजोबांनी मंत्री म्हणून ज्या बंगल्यातून कारभार पाहिला, त्याच बंगल्यातून नातू शंभूराज देसाई यांनाही काम पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण देसाई कुटुंबीय भावूक झाले होते.

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचे आजोबा दौलतराव ऊर्फ बाळासाहेब देसाई हे 1952मध्ये पाटण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. पुढील 1957 च्या निवडणुकीत ते दुसऱ्यांदा निवडून आले आणि कॅबिनेट मंत्री झाले. बाळासाहेब देसाई यांनी शिक्षण मंत्री, कृषिमंत्री, गृहमंत्री म्हणून काम केले आहे आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. या मंत्रिपदाच्या काळात बाळासाहेब देसाई हे मुंबईत याच मेघदूत बंगल्यावर राहायला होते. मंत्री झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा मेघदूत हाच बंगला मिळाला हेाता.

बाळासाहेब देसाई हे गृहमंत्री असताना याच मेघदूत बंगल्यावर राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा 17 नोव्हेंबर 1966 रोजी जन्म झाला. त्यानंतर तब्बल पाच वर्षे ते या बंगल्यावर होते. शंभूराज देसाई यांचे संपूर्ण बालपण याच बंगल्यात गेले, त्यामुळे मेघदूत बंगल्याशी (Meghdoot Bungalow) शंभूराज देसाई यांच्या अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. संपूर्ण देसाई कुटुंबीयांसाठी हा बंगला विशेष मानला जातो.

महायुती सरकारमध्ये शंभूराज देसाई यांना पर्यटन आणि खणीकर्म मंत्रालयाचा पदभार मिळाला आहे. मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करताना शंभूराज देसाई यांनी मेघदूत बंगला हक्काने मागून घेतला. त्या बंगल्याशी शंभूराज यांच्या जन्म, बालपणाबाबतच्या अनेक आठवणी आहेत, त्यामुळे शंभूराज देसाई यांनी मेघदूत बंगला आवडीने घेतला.

मेघदूत बंगल्यावर आज देसाई यांनी गृहप्रवेशाचा कार्यक्रम ठेवला हेाता. त्यांच्या आईचा आज वाढदिवस आहे, त्या निमित्ताने शंभूराज देसाई यांना गृहप्रवेशाची पूजा ठेवली हेाती. संपूर्ण कुटुंबीय जेव्हा गृहप्रवेशासाठी मेघदूत बंगल्यावर आले, त्या वेळी त्यांना बालपणीच्या आणि अनेक वर्षांच्या आठवणी दाटून आल्या शंभूराज देसाई आणि कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

तब्बल 55 वर्षांनंतर देसाई कुटुंबीय हे मेघदूत बंगल्यावर राहण्यासाठी परत आले होते, त्यामुळे देसाई कुटुंबीयांच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. शंभूराज देसाई यांचा जन्म आणि बालपण याच बंगल्यात गेल्याने त्यांना अश्रू रोखता येत नव्हते. ते हमसून हमसून रडत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT