Shiv Sena News : एकनाथ शिंदेंचा भाजपला धक्का; यवतमाळच्या तेजस ठाकरे यांची शिवसेनेत एंट्री

Tejas Thackeray joins Shiv Sena News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तेजस ठाकरे यांनी प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री संजय राठोडांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

ShivSena news : काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांनी भाजपला धक्का दिला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे (BJP) कार्यकर्ते तेजस गोविंद ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागांव आणि नेर भागातील कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत शिंदे यांच्या उपस्थित मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंत्री संजय राठोड देखील उपस्थित होते.

Eknath Shinde
Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी कसोटीचा काळ

ठाकरे यांच्या या प्रवेशामुळे यवतमाळमध्ये भाजपला धक्का बसल्याचे मानले जात आहे, तसेच शिवसेनेच्या (Shiv sena) शिंदे गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बळकटी यानिमित्ताने लाभली आहे. यवतमाळहुन आलेले हे सर्व जण आधीपासूनच मुंबईत येऊन थांबले होते. तर एकनाथ शिंदे दिल्लीवरून गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता आले. त्यानंतर हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिंदे यांनी यवतमाळ येथील पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

Eknath Shinde
Shiv Sena symbol dispute : राष्ट्रपतींमुळे शिंदे काही दिवस तरी निवांत झाले... ठाकरेंचे 'उम्मीद पे दुनिया कायम है...'

या प्रवेशावेळी बोलताना शिंदे म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीत महायुतीला 232 जागांचे बहुमत मिळाले. लाडक्या बहिणींनी ही भरभरुन मदत केली. ही नांदी ठरली आहे. महायुतीवर लोक विश्वास दाखवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या पुढील काळात विरोधकांमध्ये कोणी शिल्लक राहील किंवा नाही याबद्दल मला शंका आहे. '

Eknath Shinde
Sanjay Raut speech : राज्य सरकारच्या विरोधात बोलले तर जेलमध्ये टाकले जाते; संजय राऊत यांची टीका

दरम्यान, तेजस ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश ही निश्चितच राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची घटना आहे. ठाकरे नावाशी असलेली जोड आणि त्यांचा शिंदे गटात प्रवेश यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगणे साहजिकच आहे. ठाकरे यांच्या या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले आहे.

Eknath Shinde
Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'शेकाप'चा मेळावा 'मराठी'च्या मुद्द्यावर गाजवला,जयंत पाटलांनाही काढला चिमटा; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com