Ratnagiri News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेश टायगरचा गेअर बदलला असून माजी आमदार राजन साळवींच्या प्रवेशानंतर आता प्रवेशासाठी रांग लागली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना जिल्हात संपत चालली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा जिल्ह्यात भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात आला असून चिपळूण आणि दापोलीतील मोठ्या चेहऱ्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे पक्षाला गळती लागली असून मुख्य पदांवर कार्यरत असणारे अनेक चेहरे पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत. ते शिंदे शिवसेनेसह भाजपच्या वाटेवर आहेत. यामुळे ठाकरे पक्ष येथे अडचणीतच येण्याची शक्यता असून आगामी काळात पक्षाला नेतृत्वच मिळेल की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
याचदरम्यान चिपळून शहरात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार असून माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहे. शुक्रवारी (ता.28) त्यांचा सिंधुदुर्गमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी काही माजी नगरसेवकाचा देखील पक्षप्रवेश होईल, असे बोलले जातेय. या माजी नगरसेवकाने मागील निवडणुकीत महत्वाचे भूमिका बजावली असून त्याने नव्या कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केलीय. पण आता तोच माजी नगरसेवक आता भाजपमध्ये जात असल्याने ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.
एकीकडे धक्कांवर धक्के ठाकरे गटाला बसत असतानाच दापोली नगर पंचायतीमध्ये देखील मोठा धक्का बसला आहे. दापोली नगर पंचायतीमधील ठाकरे गट शिंदे यांच्या शिवसेनेने फोडला असून उपनगराध्यक्षांसह नगरसेवकच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे दापोली नगर पंचायतमध्ये सत्ताधारी ठाकरे शिवसेना अल्पमतात येणार असून नगराध्यक्ष ममता मोरे यांचे नगराध्यक्षपद धोक्यात येणार आहे.
दापोली नगर पंचायतीचे ठाकरे शिवसेना गटाचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे हे आपल्या विश्वासू नगरसेवकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. अडीच वर्षांपूर्वी नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या सहा नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा एकदा ते राजकीय मार्ग बदलण्याच्या तयारीत असून ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान मंगळवारीच (ता.25) उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट घेतली होती. जी शिवसेना प्रवेशासाठी झाल्याच्या सुरू होत्या. उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्यासह काही नगरसेवकांचा पक्ष प्रवेश उद्या शुक्रवारी (ता. 28) होणार आहे. याबाबत रखांगे यांनी दुजोरा दिला आहे. यामुळे सत्ताधारी ठाकरे शिवसेना अल्पमतात येणार असून नगराध्यक्ष ममता मोरे यांचे नगराध्यक्षपद धोक्यात येणार आहे. त्यामुळे ममता मोरे कोणती भूमिका घेणार, याकडे गर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.