Shivsena UBT News : उमेदवारीसाठी बांधलेले शिवबंधन तोडून दिनेश परदेशींची भाजपमध्ये घरवापसी!

Dinesh Pardeshi, who contested the assembly elections under Uddhav Thackery marking a major political development. : ऐन निवडणुकीच्या तोंडावर अंबादास दानवे यांनीच माजी नगराध्यक्ष भाजपचे दिनेश परदेशी यांना पक्ष प्रवेश दिला. परदेशी यांनाच उमेदवारी दिली जाणार हे स्पष्ट झाल्यामुळे चिकटगांवकर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता.
Dinesh Pardeshi Join BJP News
Dinesh Pardeshi Join BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : विधानसभा निवडणुकीत महायुतीमुळे उमेदवारी मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्यानंतर भाजपातील अनेक इच्छुकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. अर्थात नेत्यांचा हिरवा कंदील मिळवूनच हे प्रवेश झाले होते. परंतु पराभूत झालेल्या मराठवाड्यातील बहुतांश भाजपामधून आलेल्या उमेदवारांनी पुन्हा घरवापसीचा निर्णय घेतला आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले दिनेश परदेशी यांनी उमेदवारीसाठी बांधलेले शिवबंधन तोडून पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.

वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार दिवंगत आर.एम.वाणी यांचे शिष्य प्रा. रमेश बोरनारे यांना उमेदवारी देण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांच्यासाठी वैजापूरमध्ये सभा घेतली होती. या निवडणुकीत बोरनारे यांनी राष्ट्रवादीच्या अभय पाटील चिकटगांवकर यांचा पराभव केला होता. मात्र अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात बोरनारे सहभागी झाले आणि त्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला.

2024 मध्ये बोरनारे यांना घरी बसवून धडा शिकवण्याच्या निर्धाराने जिल्हाप्रमुख अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. विधानसभा उमेदवारीचा शब्द मिळाल्यामुळे त्यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली होती. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर अंबादास दानवे यांनीच माजी नगराध्यक्ष भाजपचे दिनेश परदेशी यांना पक्ष प्रवेश दिला.

Dinesh Pardeshi Join BJP News
Shivsena UBT : "ठाकरेंच्या शिवसेनेत संवाद नाही, केवळ चाटूकारांची फौज..."; प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केलेल्या तिवारींचा राऊतांसह ठाकरेंवर हल्लाबोल

परदेशी यांनाच उमेदवारी दिली जाणार हे स्पष्ट झाल्यामुळे चिकटगांवकर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत थेट प्रा. रमेश बोरनारे यांना पाठिंबा जाहीर करत त्यांचे काम केले. परिणामी रमेश बोरनारे यांचा विजय झाला तर परदेशी पराभूत झाले. चाळीस हजारांच्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतर आता आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत परदेशी यांनी घरवापसीचा निर्णय घेतला. आज मुंबईत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

Dinesh Pardeshi Join BJP News
MLA Ramesh Bornare News : उद्धव ठाकरेंची टीका जिव्हारी, आमदार बोरनारेंचाही पलटवार

याआधी वैजापूरचेच एकनाथ जाधव, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील सुरेश बनकर यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. आता हे नेते जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडले असले तरी त्यांच्या निष्ठा या भाजपाशीच होत्या. केवळ विधानसभेची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी तात्पुरता पक्ष बदलला होता. परंतु या सोयीच्या राजकारणामुळे वैजापूरमध्ये भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासारखा नेता उद्धव ठाकरे पक्षाला गमवावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com