Shivsena UBT News : मर्सिडीजमधून फिरणारा होणार उबाठाचा संपर्कप्रमुख !

Mercedes luxury car News : नागपूर शहराच्या संपर्क प्रमुखपदासाठी उबाठात मोठी स्पर्धा लागली आहे. या बैठकीत नागपूर शहराचे दोन जिल्हा प्रमुख, पूर्व विदर्भाचे सहसंघटक, राज्य संघटक, एक प्रवक्ता आणि विधानसभेच्या उमेदवाराचा समावेश होता. यातील तीन इच्छुकांकडे आलीशान गाड्या आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मर्सिडिज दिल्याशिवाय उद्वव बाळासाहेब ठाकरे सेनेत पद मिळत नाही या विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांमुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यातच नागपूर शहराच्या संपर्क प्रमुखपदासाठी उबाठात मोठी स्पर्धा लागली आहे. एक बैठकही अलीकडेच मुंबईत पार पडली. या बैठकीत नागपूर शहराचे दोन जिल्हा प्रमुख, पूर्व विदर्भाचे सहसंघटक, राज्य संघटक, एक प्रवक्ता आणि विधानसभेच्या उमेदवाराचा समावेश होता. यातील तीन इच्छुकांकडे आलीशान गाड्या आहेत. ते व्यावसायिकसुद्धा आहेत. मर्सिडिजच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या भावी संपर्क प्रमुखाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात महायुतीची सत्ता येताच माजी आमदार आणि नागपूरचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) आधीच उडी घेऊन मोकळे झाले आहेत. ते नेतृत्व करीत असताना नितीन तिवारी आणि दीपक कापसे या दोन कट्टर समर्थकांना त्यांनी शहर प्रमुख केले होते. यासाठी कापसे यांना काँग्रेस सोडायला लावली होती. विधानसभेच्या निवडणुकीत ग्रामीणचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ग्रामीणचे माजी अध्यक्ष राजू हरणे यांना थेट पक्षातूनच काढून टाकण्यात आले होते. ते आता शिंदे सेनेत सहभागी झाले आहेत.

Uddhav Thackeray
Shivsena UBT : दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाला धक्का? विषय समित्यांवर महायुतीचे वर्चस्व, योगेश कदमांनी बाजी मारली

दुष्यंत चतुर्वेदी सोडून गेल्याने रिक्त असलेल्या नागपूरच्या संपर्क प्रमुखासाठी उबाठातील पदाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. यात जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडे, विशाल बरबटे, सतीश हरडे, सागर डबरासे आणि जयदीप पेंडके यांचा समावेश आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत दुसरे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया हेसुद्धा उपस्थित होते. हे बघता बैठकीत उपस्थित असलेल्यांमधूनच एकाला संपर्क प्रमुख करण्यात येईल, अशी चर्चा आहे.

Uddhav Thackeray
Congress : पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, धंगेकरांचा शिवसेना प्रवेश निश्चित; पुणे काँग्रेसला कोण सावरणार?

डबरासे राज्य संघटक असले तरी अलीकडेच शिवसेनेत आले आहेत. बसपा, वंचित आघाडीसह अनेक पक्षात त्यांनी यापूर्वी पर्यटन केले आहे. हरडे यापूर्वी नागपूरचे जिल्हाध्यक्ष होते. पूर्व विदर्भाचे संघटक आहेत. मानमोडे यांनी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी आणि शिवसेना असा प्रवास केला आहे. ते बँकर आणि व्यावसायिक आहेत. विशाल बरबटे यांनी मनसेतून राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यांनी रामटेकमधून विधानसभेची निवडणूक लढवली आहे. त्यांचा कार विक्रीचाच व्यवसाय आहे.

Uddhav Thackeray
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा; अटकेची टांगती तलवार, काय आहे प्रकरण

प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया यांनी दक्षिण नागपूरमधून उमेदवारी मागितली होती. मात्र, काँग्रेसही ही जागा सोडण्यास ठाम नकार दिला होता. मानमोडे यांना शिवसेनेने शब्द दिला होता, असा दावा केला जातो. जयदीप पेंडके यांचे मुंबईतील नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. संजय राऊत असो की विनायक राऊत नागपूरमध्ये त्यांची बडदास्त तेच राखतात. याशिवाय पर्यटनाचा त्यांचा व्यवसाय आहे.

Uddhav Thackeray
Mahayuti : दलित अत्याचारावरून केंद्रीय मंत्राने महायुतीवर खापर फोडले; पंतप्रधान मोदींचा राखला आदर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com