Shambhuraj Desai, Jitendra Dudi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sugarcane FRP : पालकमंत्री देसाईंच्या जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा जिल्हाधिकारी सोडवणार

Satara collector साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांनी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखान्यांचे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले आहे.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Satara Sugarcane FRP News : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन महिनाभराचा कालावधी होत आला. बहुतांशी कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही, असा आरोप करत शेतकरी संघटनांनी पालकमंत्री देसाई यांनी बैठक घ्यावी, असे आवाहन केले होते. मात्र, पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी बैठक घेतील, असे आश्वासन दिले. त्यानुसार येत्या गुरुवारी (ता. ३०) सकाळी अकरा वाजता साताऱ्यातील नियोजन भवनात संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक होणार आहे.

उसाला योग्य भाव Sugarcane FRP मिळावा, यासाठी शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन सुरू आहेत. त्यामुळे ऊस वाहतुकीची वाहने अडवून उसाला शेतकरी संघटनांकडून Farmers Association दर मागण्यात येत आहे. त्याचा विचार करून जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखान्यांचे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले आहे.

त्या बैठकीत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खराडे, शेतकरी संघटना किसान मंचचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत यंदाच्या हंगामातील ऊसदराचा तोडगा निघेल, अशी आशा आहे. त्यामुळे या बैठकीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी ११ वाजता नियोजन भवनमध्ये बैठक होत आहे. त्यास जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्या बैठकीस कारखानदारांनी प्रतिनिधी पाठवू नये, स्वतः यावे, असेही आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे. maharashtra Political News

बळीराजा शेतकरी संघटनेने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे ऊसदरासंदर्भात बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी साखर कारखाना व शेतकरी संघटनांची ऊसदरासाठी दुसऱ्यांदा बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये तोडगा निघून सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटेल, अशी आशा आहे.

- पंजाबराव पाटील (केंद्रीय अध्यक्ष, बळीराजा संघटना)

Edited By : Umesh Bambre

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT