Nashik News : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली. त्यानंतर थोरातांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा आपला राजीनामा दिला. परिणामी थोरात-पटोले वाद चिघळल्याच्या चर्चा झाल्या. या पार्श्वभूमीवर आज संगमनेरमध्ये सत्यजीत तांबे यांनी संवाद मेळावा आयोजन केले होते.
या मेळाव्यानिमित्त उपचारानंतर प्रथमच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) संगमनेरमध्ये आले होते. त्यावेळी थोरात आणि सत्यजीत तांबे यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले. यावेळी थोरात यांनी तांबे कुटुंबीय आणि काँग्रेसबाबात, तसेच महिन्याभरात झालेल्या घटनांबाबत महत्वाचे विधान केले आहे.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारत जोडो यात्रेचे नियोजनाबाबत सत्यजीत आणि त्याच्या टीमने चांगले काम केले होते. राहुल गांधी यांनी शेगावमधील सभेचे जोरदार कौतुक केले. यामध्ये सत्यजीतने खूप मेहनत घेतली होती. याची आठवण करून देत थोरत म्हणाले सत्यजीत तुझी टीम काँग्रेसमध्ये आणि तू एकटाच राहिलास. पण तुलाही करमायचे नाही आणि काँग्रेसलाही करमायचे नाही. त्यामुळे काहीही काळजी करू नकोस, असं सूचक वक्तव्य करून तांबेच्या काँग्रसवापसीबाबत तोडगा काढण्याची ग्वाही थोरातांनी यावेळी दिली.
तांबे कुटुंबाबाबत थोरात म्हणाले की, डॉ. तांबे यांनी जे राजकारण ते अत्यंत विचाराने केले. तांबे कुटुबांच्या रक्तात पुरोगामी विचार आहेत. त्यांचे विचार कायम पुरोगामी राहिले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींशी बोलू. सत्यजीतशीही (Satyjeet Tambe) बोलून निर्णय घेऊ, असे म्हणत थोरांतांनी तांबे कुटुंब काँग्रेसचा भाग असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. यानंतर सत्यजीत तांबे यांनी केलेल्या आरोपावर ते म्हणाले की, तो युवक काँगेसचा आहे. युवक काँग्रेसचे पदाधिकारी थोडे गरमच असतात.
थोरात पुढे बोलाताना म्हणाले की, सत्यजीत म्हणण्यानुसार निवडणुकीत तांत्रिक चूक झाली. मात्र माझा हात नीट असता तर निवडणुकीत तीही झाली नसती. यानंतर नगरमधील सुरू असलेले सुडाचे राजकारण जिल्हा खपवून घेणार नसल्याचा इशाराही राधाकृष्ण विखे पाटलांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.