Ajit Pawar : "स्वतःचं ठेवायचं झाकून..."; 'त्या' शपथविधीवरून मस्केंचा पवारांवर हल्ला

NCP News : पुण्यातील एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत राष्ट्रवादीवर निशाणा
Ajit Pawar, Naresh Mhaske
Ajit Pawar, Naresh MhaskeSarkarnama

Pune News : पहाटेच्या शपथविधीचे प्रकरण अडीच वर्षांनंतरही चर्चेले जात आहे. आज त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक विधान केले. ते शरद पवारांनी खोडूनही काढले. त्यानंतर ठाणेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी तर त्यावेळी घडलेल्या घटनाक्रमांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी म्हस्के यांनी राष्ट्रवादीतीलच एका नेत्याने सांगितलेल्या माहितीचा आधार घेतला. त्यामुळे पहाटेचा शपथविधी आजही उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

पुण्यात एकनाथ शिंदे गटाची बैठक पार पडली. त्यावेळी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) उपस्थित होते. तेथे त्यांनी विरोधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली. यावेळी पवार यांच्या उद्धव ठाकरे यांचा दगा दिलेल्यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यावेळी त्यांनी पहाटेचा शपथविधीचे प्रकरण छेडले.

Ajit Pawar, Naresh Mhaske
Pune Politics : मुक्ता टिळकांच्या मरणाची वाट पाहणाऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली; काँग्रेसचा घणाघात

म्हस्के म्हणाले, "स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून, अशी सध्याची परिस्थिती अजित पवार (Ajit Pawar) यांची आहे. अजितदादा तारीख विसरले असतील म्हणून मी तारीख सांगतो. मला एका राष्ट्रवादीतील एकाने सांगितलं की, राज्यपालांनी बोलावलं त्यावेळी अजितदादा दात न घासता गेले होते."

Ajit Pawar, Naresh Mhaske
Nana Patole News : राहुल अन् प्रियंका गांधींबद्दल प्रश्‍न विचारताच नाना पटोलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू

शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही आमदार सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यास शिंदे गटास जबाबदार धरले जाते. त्यावरून महाविकास आघाडीकडून वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गटाला गद्दार म्हणून हिणवले जाते. याचाही म्हस्के यांनी चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले, "जर तुम्ही एकनाथ शिंदे यांनी केलेल्या गोष्टीला गद्दारी म्हणत असाल तर आपण केलेलं बंड होतं का? शरद पवार यांच्या विरोधात उठाव होता का? याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी पाहिलं करावं."

Ajit Pawar, Naresh Mhaske
Manmad Water Problem : मनमाडला आता महिन्यानं नाही तर दररोज पाणी मिळणार; मुख्यमत्र्यांचा विश्वास

यानंतर म्हस्के यांनी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितलेली माहिती दिली. ते म्हणाले, "ठाण्यातील राष्ट्रवादीमधील एका नेत्याने मला सांगितले होतं की अजितदादांचे पुतळे जाळण्याचे आदेश होते. जर अजित पवारांची कृती बरोबर होती, मग तुमच्या कार्यकर्त्यांना पुतळे जाळायला का सांगितलं?, असा प्रश्न उपस्थित करून पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांना घेरण्याचा म्हस्के यांनी प्रयत्न केला.

Ajit Pawar, Naresh Mhaske
Bhagat Singh Koshyari : कोश्यारी हे भाजपचे कार्यकर्ते म्हणून राज्यपाल पदावर बसले होते; नाना पटोलेंचा हल्लाबोल

"शिवसेनेतून बाहेर पडल्याने शिंदे गटास गद्दार म्हणून हिणवता. मग काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी (NCP) स्थापन केली ते काय होतं? ती गद्दारी नव्हती का?", असे प्रश्न उपस्थित करून म्हस्के यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही निशाणा साधला.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पहाटेचा भोंगा असा उल्लेख करून त्यांची खिल्ली उडवली. म्हस्के म्हणाले, "संजय राऊत जेलमधून सुटल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे सकाळी उठतात आणि भोंग्याप्रमाणे बोलतात."

Ajit Pawar, Naresh Mhaske
Sarkarnama Impact : फडणवीसांच्या जिल्ह्‍यात ‘हा’ अंक होण्यापूर्वीच अधिकारी निलंबित !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पहाटेच्या शपथविधी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या सहमतीने झाला होता, असे विधान केले होते. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर फडणवीस यांचं वक्तव्य असत्यावर आधारित आहे, असे म्हणत शरद पवार यांनी त्यांच्या वक्तव्याचे खंडणही केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com