Maharashtra Politics :...म्हणून फडणवीसांनी शरद पवारांविषयी ते विधान केले; अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितले

Congress : देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशोक चव्हाणांची टीका
Ashok Chavan
Ashok Chavan Sarkarnama

Ashok Chavan News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी पहाटे शपथ घेत काही तासांचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता याच प्रकरणावर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सरकार स्थापन झालं होतं, असं विधान फडणवीसांनी केलं आहे. तर यावर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं असून निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांना असा साक्षात्कार होतो, अशी टीका चव्हाणांनी केली आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

Ashok Chavan
Nana Patole News : राहुल अन् प्रियंका गांधींबद्दल प्रश्‍न विचारताच नाना पटोलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू

चव्हाण म्हणाले, ''देवेंद्रजींना हा साक्षात्कार निवडणुकीच्या तोंडावर कसा होतो हा एक प्रश्नच आहे. पण शरद पवार (Sharad Pawar) हे ज्येष्ठ नेते आहेत आणि एक मुरब्बी राजकारणी आहेत. ते जी काही भूमिका घेतात ते खुलेआम घेतात''.

''लपूनछपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आज जे काही विधान केले आहे ते निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्यासाठी केलेले आहे'', असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

Ashok Chavan
Pune Politics : मुक्ता टिळकांच्या मरणाची वाट पाहणाऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली; काँग्रेसचा घणाघात

चव्हाण पुढे म्हणाले, ''कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिंकेल. काँग्रेसने प्रचारात देखील मुसंडी मारली आहे. त्यामुळेच भाजपला अशा वेगवेगळ्या प्रकारची दुर्दैवी रणनीती आखण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शरद पवारांबाबत फडणवीसांनी जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे '', असंही ते यावेळी म्हणाले.

Ashok Chavan
Bhagat Singh Koshyari : कोश्यारी हे भाजपचे कार्यकर्ते म्हणून राज्यपाल पदावर बसले होते; नाना पटोलेंचा हल्लाबोल

''अमित शाह यांचा पुणे दौरा आहे. ज्याअर्थी केंद्रीय नेतृत्वाला पाचारण करण्यात येत आहे. याचा अर्थ असा आहे की स्थानिक नेतृत्वाला प्रभाव पाडता येत नाही'', असं म्हणत त्यांनी भाजपला खोचक टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com