Abhijeet Patil-Bhagirath Bhalke-kalyanrao kale-Prashant Paricharak Sarkarnam
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Election : भाजप उमेदवाराच्या बिनविरोधसाठी अभिजीत पाटील, भालकेंचेही प्रयत्न; विठ्ठल परिवार तीन गटांत विभागला!

Zilla Parishad - Panchayat Samiti Election 2026 : पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अभिजीत पाटील आणि भगीरथ भालके यांनी स्वतंत्र उमेदवार दिल्याने राजकीय समीकरणे बदलली असून विठ्ठल परिवाराला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

भारत नागणे

Pandharpur, 27 January : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजप विरोधात आमदार अभिजीत पाटील आणि भगीरथ भालके एकत्रित येतील अशी शक्यता असतानाच भालके आणि आमदार पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार देवून स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे विठ्ठल परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

कल्याणराव काळे, समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी पूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भगीरथ भालके (Bhagirath Bhalake) आणि आमदार पाटील एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. विठ्ठल परिवारातील नेत्यांची राजकीय ताकद तीन गटांत विभागल्याने साहजिकच याचा भाजपला फायदा होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.

गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनंदा हणमंत पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथे आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) गटाला मोठा धक्का बसला आहे. वाखरी जिल्हा परिषद गटातून आमदार अभिजीत पाटील गटाचे उमेदवार मयूरी बागल यांच्या विरोधात भालके यांनी सुनीता संग्राम गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.

कासेगाव जिल्हा परिषद गटात वसंतराव देशमुख व आमदार अभिजीत पाटील यांनी दिलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस उमेदवाराच्या विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून व्यकंट भालके यांना निवडणुकीच्या रिंगात उतरवले आहे. वाखरी, कासेगाव, रोपळे, टाकळी या चार जिल्हा परिषद गटामध्ये भाजप,राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी-शिवसेनेच्या प्रमुख उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

दरम्यान, गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील भाजप उमेदवार दुर्गा अंकुशराव यांना बिनविरोध करण्यासाठी भाजपसह आमदार अभिजीत पाटील, भगीरथ भालके या प्रमुख नेत्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. भाजप उमेदवार दुर्गा गोपाळ अंकुशराव यांच्या विरोधात शिवसेना, बहुजन वंचित आघाडीसह दोन अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. येथील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषद व पंचायत समिती गणामध्ये आमदार अभिजीत पाटील यांच्या विरोधात भगीरथ भालके यांनी उमेदवार दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. मंगळवारी (ता. 27) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ जिल्हा परिषद गटासाठी 47 उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत. 67 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले.

पंचायत समितीच्या 16 गणासाठी 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंणात आहेत. 214 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. उमेदवारी मागे घेण्यासाठी तिन्ही गटाकडून अपक्ष उमेदवारांची शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणी सुरु होती. अनेकांचे रुसवे फुगवे काढण्यासाठी प्रमुख पदाधिकार्यांची धावपळही या निमित्ताने पाहायला मिळाली.

गोपाळपूर गटातील भाजप उमेदवार दुर्गा अंकुशराव यांच्या विरोधातील अर्ज काढण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न सुरु होते. त्यात यश आले नाही. यामध्ये गोपाळपूर येथील माजी सरपंच शिवाजी आसबे यांची कन्या शीतल शिवाजी आसबे या अपक्ष म्हणून निवडणूकीत उतरल्या आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून शुभांगी शंकर पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवारांची नावे

गोपाळपूर- दुर्गा अंकुशराव (भाजप), प्रियांका परांडे( शिवसेना), शुभांगी पवार (वंचित बहुजन आघाडी), शितल शिवाजी आसबे (अपक्ष), मनिषा काळे( अपक्ष)

वाखरी : मोनिका काळे( भाजप),अश्विनी कोळी( उबाठा),गायत्री डावरे(बहुजन समाज पार्टी), मयुरी बागल( राष्ट्रवादी काॅंग्रेस),सुनिता संग्राम गायकवाड(तीर्थक्षेत्र विकास आघाडी),रंजना कौलगे पाटील( अपक्ष),मालन फाटे( अपक्ष),राजेश्री माने( अपक्ष)

करकंब : नितीन गायकवाड ( बहुजन समाज पार्टी), अदिनाथ देशमुख( भाजप), बाळासाहेब देशमुख( राष्ट्रवादी काॅंग्रेस),जालिंदर शिंदे(उबाठा),सादिक पठाण(वंचित बहुजन आघाडी), अभिजीत दगडे( अपक्ष), विजय माळी( अपक्ष), सिताराम रणदिवे( अपक्ष)

भाळवणी गट : सुप्रिया गायकवाड( राष्ट्रवादी काॅंग्रेस), जयश्री लोखंडे( भाजप) रोपळे गट- रेश्मा पाटोळे( बहुजन समाज पार्टी), ताई वनसाळे( भाजप), गीतांजली साळुंखे( राष्ट्रवादी काॅंग्रेस),उमा खरे( महाराष्ट्र विकास सेना),जमनाबाई फडतरे( तीर्थक्षेत्र विकास आघाडी), प्रांजल खरे( अपक्ष)

भोसे : शनमुखी कोरके( राष्ट्रवादी काॅंग्रेस),प्रफुल्लता पाटील( भाजप),पल्लवी लोंढे( अपक्ष)

टाकळी गट यल्लाप्पा कांबळे( बहुजन समाज पार्टी), दिपक चंदनशिवे(शिवसेना), नंदकुमार वाघमारे( भाजप),तानाजी कांबळे( तीर्थक्षेत्र विकास आघाडी), सत्यवान चंदनशिवे(वंचित बहुजन आघाडी),दत्तात्रय होवाळ( आरपीआय),वैभव कांबळे( अपक्ष),गणेश चंदनशिवे(अपक्ष), मल्हारी फाळके( अपक्ष)

कासेगाव गट : व्यंकट भालके (तीर्थक्षेत्र विकास आघाडी), हरी गावड (भाजप), संजय वाघमारे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस), अनिल हेगडकर (रासप), राजू आर्वे (अपक्ष)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT