Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar Death : अजितदादांच्या निधनाने कट्टर विरोधकही हळहळला; महेश लांडगे म्हणाले, ‘असा नेता पुन्हा होणं नाही...’

Mahesh Landge Reaction : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे राज्यभर शोककळा पसरली असून राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

Sudesh Mitkar

Pune, 28 January : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचा आज (ता. 28 जानेवारी) सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात अकाली मृत्यू झाला आहे.

मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या खासगी चार्टर्ड विमानाच्या लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटल्याने ते शेतात कोसळले आणि भीषण आग लागली. या अपघातात अजित पवारांसह (Ajit Pawar) विमानातील इतर सर्व पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. विविध राजकीय नेते अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक होत असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी देखील याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महेश लांडगे (Mahesh Landge) म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आणि अतिशय धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

अजितदादांसारखा धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या जाण्यानं एक लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी पहाटे सहापासून तळमळीनं काम करणारे ते खरे लोकसेवक होते.

राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेलं योगदान हा महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवील. दादांचं अकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT