Ajit Pawar Death : अजितदादांच्या आठवणींनी सोपलांचा कंठ दाटला; ‘नियतीने इतका क्रूर वार महाराष्ट्रावर करायला नको होता’

Dilip Sopal Reaction : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले. आमदार दिलीप सोपल यांनी हळहळ व्यक्त केली असून संपूर्ण महाराष्ट्रावर दु:ख आणि शोककळा पसरली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 January : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघतात आज (ता. 28 जानेवारी) अकाली मृत्यू झाला. अजितदादांच्या या अकाली मृत्युमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून राज्यावर शोककळा पसरली आहे. अजितदादांचे अनेक वर्षांचे सहकारी आमदार दिलीप सोपल यांनी ‘नियतीने इतका क्रूर वार महाराष्ट्रावर करायला नको होता,’ अशी भावना व्यक्त करताना आमदार सोपल यांचा कंठ दाटून आला होता.

आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) म्हणाले, आम्ही सर्व सहकारी आणि कुटुंबीय सकाळी ही बातमी ऐकल्यापासून शॉकमध्ये आहोत. काहीही सूचत नाही, अशी अवस्था आमच्या सहकाऱ्यांची आहे. माझे सहकारी युवराज काटे यांचा पहिला फोन आला. त्यांनी मला टीव्ही लावून बातम्या बघण्याची विनंती केली. मी पाहिले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा विमान अपघतात मृत्यू झाल्याचे ऐकलं. ते ऐकून मन सुन्न झालं.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबतच्या १९८५ पासूनच्या सहवासातील अनेक आठवणी, प्रसंग आहेत. कौटुंबीक सुख दुःखाचे, राजकीय सुख दुःखाच्या अनेक आठवणी आहेत. नियतीने इतका क्रूर वार महाराष्ट्रावर करायला नको होता. हे सांगताना ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांचा कंठ दाटून आला होता.

Ajit Pawar
Ajit Pawar Plane Accident : अजितदादांची विमान अपघात एक्झिट, अशा दुर्घटनांची जाणून घ्या कारणे

सोपल म्हणाले,कोणत्या शब्दांत सांगावं आणि बोलावं, असा आमच्यापुढे प्रश्न आहे. मी माझे सहकारी परिवार आणि कुटुंबाच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अजितदादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar death : 'राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे..' भावनिक पोस्ट करत राज ठाकरेंकडून अजित पवारांना श्रद्धांजली..

विशेषतः बार्शी तालुक्यावर अजित पवार यांचं खूप प्रेम आणि लक्ष होतं. आम्हा सर्वांचंच न भरून येणारं नुकसान झालं आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चीरशांती देवो, ही भगवंत चरणी प्रार्थना, अशा शब्दांत दिलीप सोपल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com