Barshi Drugs Racket Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Barshi Drugs Racket: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे लोण बार्शीपर्यंत! पोलिसांची मोठी कारवाई;13 लाखांचा ऐवज जप्त, तिघांना अटक

Barshi Crime News : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. या कारवाईत पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीच्या ड्रग्जच्या 59 पुड्या जप्त केल्या होत्या.

Deepak Kulkarni

Barshi News : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. या कारवाईत पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्ज जप्त केल्या होत्या. त्यानंतर आता बार्शी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बार्शी-परांडा रस्त्यावर अंमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती समजताच बार्शी (Barshi) पोलिसांनी सापळा रचून पेट्रोल पंपासमोर थांबलेल्या कारवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर बार्शी शहर पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन लाख रुपयांचे मॅफेड्रान(एमडी),गावठी पिस्तूल,तीन जिवंत राऊंड,रोख आठ हजार रुपये,कार असा तेरा लाखांचा ऐवज जप्त केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

बार्शी पोलिसांनी (Police) गुरुवारी (ता.17 एप्रिल) रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईत असद हसन देहलूज (वय 37,रा.पल्ला गल्ली,परांडा जि. धाराशिव),मेहफूज महंमद शेख (वय 19 रा.बावची,ता.परांडा, जि.धाराशिव),सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख(वय 32 रा. काझी गल्ली,कसबा पेठ बार्शी,जि.सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांना बार्शी-परांडा रस्त्यावर पेट्रोलपंपाजवळ अमंली पदार्थ शहरात विक्रीसाठी येत आहे, अशी माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यासाठी सापळा रचला.

गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या दरम्यान पांढरी कार क्रमांक एम.एच.12 एच.एन.7437 येऊन थांबताच पोलिसांनी कारमधून तिघांना उतरवले. दोन पंच,कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण करुन त्यांची अंगझडती घेतली. तिघांजवळ 20.4 ग्रॅम फिकट पिवळसर रंगाची पावडर असलेले मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थाचे 9 प्लास्टिक पाउच,गावठी पिस्तूल,3 जिवंत राऊंड,8 हजार रुपये रोख, 3 मोबाईल असा ऐवज जप्त केला.

या पोलिस पथकाने केली कारवाई ...

पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे,पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर,सहायक उपनिरीक्षक अजित वरपे,हवालदार श्रीमंत खराडे,विलास डबडे,अमोल माने,सागर सुरवसे,अंकुश जाधव,राहुल उदार,प्रल्हाद आकुलवार,सचिन देशमुख या बार्शी पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT