Dhananjay Munde Health Update : धनंजय मुंडेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; बेल्स पाल्सी,डोळ्यांच्या ऑपरेशननंतर आता...

Babasaheb Patil On Dhananjay Munde : धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या स्थानिक कार्यक्रमांनाही गैरहजर होते. तसेच ते विधिमंडळाच्या अधिवेशनासह सार्वजनिक कार्यक्रमात अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं होतं.
Dhananjay Munde .jpg
Dhananjay Munde .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात तत्कालीन मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंसह त्यांच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. मुंडेंनाही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर,ते उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या बीडमधील कार्यक्रमांनाही गैरहजर होते. तसेच ते विधिमंडळाच्या अधिवेशनासह सार्वजनिक कार्यक्रमात अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच आता धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) प्रकृतीबाबत नवीन मोठी अपडेट समोर आली आहे.

माजी मंत्री व परळीचे आमदार धनंजय मुंडेंबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला होता, त्यांना नीट बोलताही येत नसल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधताना दिली.

पाटील म्हणाले, धनंजय मुंडेंची सध्या तब्येत ठीक नसून त्यांना बेल्स पाल्सी या आजाराच्या निदानानंतर अर्धांगवायूचाही झटका आला. त्यांचे डोळेही वाकडे झाले आहेत. त्यांना बोलताही येत नसल्याचं त्यांनी सांगितले. आमच्या पक्षाच्या महत्त्त्वाच्या मिटींगला ते मुंबईत येतात,काही कार्यक्रमांना हजेरी लावतात,जवळच्या व्यक्तींच्या आग्रहास्तव ते कार्यक्रमांना उपस्थित राहतात,असेही सहकारमंत्री यावेळी म्हणाले.

Dhananjay Munde .jpg
Mahayuti Government On Bazar Samiti: फडणवीस सरकारचा बाजार समित्यांबाबत एकच मोठा निर्णय; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही झोपच उडाली

काही दिवसांपूर्वीच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनीही धनंजय मुंडेंची बाजू घेताना मोठं विधान केलं होतं. ते धनंजय मुंडे भगवान गडाचेच आहेत, तुम्ही त्यांच टेन्शन घेऊ नका.आपण मोठा कार्यक्रम करू. त्यांच्या गालावरून वारं गेलं आहे. सगळ्यांनी मिळून भगवानबाबाला प्रार्थना करा. चांगली वाणी बंद पडली ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन त्यांच्याकडून समाजकल्याण घडावं,एवढेच बोलू असंही त्यांनी कार्यक्रमात म्हटलं होतं.

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी नारळी सप्ताहाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांची पाठराखण करत ते पुन्हा पदावर यावेत आणि त्यांच्या हातून समाज कल्याणाचं काम घडावं, अशी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच महंत नामदेव शास्त्री काय बोलले याच्यावर मी बोलणार नाही, शेवटी गादीचा सन्मान आम्ही करतो. ते काहीही बोलले तरी आम्ही बोलणार नाही असं म्हटलं होतं.

Dhananjay Munde .jpg
Bachchu Kadu On Raj Thackeray : राज ठाकरे ठरवणारे कोण? बच्चू कडू कडाडले, 'आमदार, खासदार अन् अधिकाऱ्यांची पोरं दहा-दहा भाषा...'

तसेच धनंजय मुंडे पुन्हा पदावर येणे म्हणजे अन्याय अत्याचार त्या जिल्ह्यातल्या लोकांवर सुरू होणे, त्याचे दुष्परिणाम पुन्हा एकदा सरकारला भोगावे लागतील. कारण आत्ताच मंत्रिपदाचा गैरवापर करून किती गुंडगिरी वाढली होती, ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे होते, तेव्हा इतकी गुंडगिरी नव्हती. त्यामुळे ते पुन्हा पदावर आले तर आम्ही वस्ताद आहेतच, असा इशाराच जरांगे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com