MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News: उदयनराजे म्हणतात, चोरी करणाऱ्यांची बोटे छाटा.. बलात्काऱ्यांचे...

Udayanraje Bhosale म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीबाबतचा मुद्दा मी लावून धरला नसता, तर तो केव्हाच बाजूला पडला असता.

Umesh Bambare-Patil

सातारा : बाहेरच्या देशात कायदे कडक आहेत. आपल्याकडे सुध्दा तसे कडक कायदे करायला हवेत. चोरी करणाऱ्यांची बोटे छाटली जातील. बलात्कार करणाऱ्यांचे काहीही छाटा.... एका बाजूला स्त्रीला आपण आदिशक्ती म्हणतो, तीचा स्वाभिमान जपण्याचं काम आपण केलं पाहिजे, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

छत्रपती संभाजीराजे यांचे थोर सुपूत्र स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहूराजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त आज खासदार उदयनराजे यांनी संगम माहुली येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीबाबतचा मुद्दा मी लावून धरला नसता, तर तो केव्हाच बाजूला पडला असता. उशिरा का होईना आता लोक एकत्र येतायत ही चांगली गोष्ट आहे. सीमा प्रश्नावर भाष्य करताना ते म्हणाले, भाषावार प्रांत रचना होणे अपेक्षित होते. पण ते झाला नाही.

सीमावादावर महाजन समिती बसवली, त्याला जमले नाही. त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांची इच्छा शक्ती नव्हती. तुमच्या राजकारणामुळे सीमावर्ती भागातील लोकांची प्रगती खुंटत आहे. यामध्ये पंतप्रधानांनी मध्यस्ती करणे गरजेचे होते.

स्त्रीयांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, याविषयी विचारले असता ते म्हणाले, मी तर नेहमी सांगतो कायदा शिल्लक राहिला आहे का. बलात्काराचा गुन्हा करणारे धनधांडगे पैशाच्या जोरावर वकील, पोलिस खरेदी करतात. त्यामुळे लोकांचा लोकशाही वरचा विश्वास उडत चालला आहे.

बाहेरच्या देशात कायदे कडक आहेत. आपल्याकडे सुध्दा तसेच कडक कायदे करा. चोरी करणाऱ्यांची बोटे छाटली जातील. बलात्कार करणाऱ्यांचे काहीही छाटा... एका बाजूला स्त्रीला आपण आदिशक्ती म्हणतो. तीचा स्वाभिमान जपण्याचं काम तरी आपण केलं पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT