Narendra Modi, Udayanraje Bhosale  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : उदयनराजेंनी केली मोदींची स्तुती; जातपातीचे राजकारण थांबले पाहिजे...

Maratha Reservation खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण विषयांवर भाष्य केले.

Umesh Bambare-Patil

Satara Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला आहे. मी कारण नसताना कोणाची स्तुती करत नाही. त्यांनी काम केले आहे. त्यांचा आदर्श घेतलाच पाहिजे. यापूर्वी कोणी का ‘मन की बात’ बोललं नाही. आतापर्यंत मी अनेक पंतप्रधान बघितलेत. प्रत्येकाने छत्रपतींचे विचार सांगितले पण, त्यांनी ते अंमलात आणले नाहीत, तसेच सोडून दिले, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी Narendra Modi आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्याशी तुमची बैठक झाली आहे. नेमकी काय भूमिका राहणार आहे. यावर खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale म्हणाले, मंडल आयोगाची स्थापना झाली, त्यावेळी व्ही.पी. सिंग पंतप्रधान होते. मी कामनिमित्त दिल्लीतच होतो. त्यावेळी भर रस्त्यावर मंडल आयोगाच्या बाजूची आणि विरोधातील लोक पेटवा पेटवी करत होती. याला जबाबदार कोण.

मुळात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला कोणत्याही जातीतील असो त्याला मदत करा, आरक्षण द्या, हे माझे पहिल्यापासून मत आहे. तुम्ही पदावर आहात लोकप्रतिनिधी आहात. लोक तुम्हाला मतदान करतात. त्यावेळी तुम्ही त्यांना हात देऊन वर ओढून घ्यायचे असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जात, पात मानली नाही. आणि मीही मानत नाही.

म्हणतात ना जाता जाता जात नाही, त्याला जात म्हणतात, हे दुर्दैव आहे. माझ्यापेक्षा जो कोण चांगला आहे, त्यालाच जातीमुळे त्याला आळा बसतो. हे कुठंतरी थांबले पाहिजे. सध्या जग वेगाने पुढे जात असून जगात मोठ्या घडामोडी होत आहेत. हे काहीही टिकाणार नाही त्यामुळे माझे मत आहे की दुर्बलांना मेरिटवर संधी मिळाली पाहिजे.

जात पातीचे राजकारण थांबले पाहिजे यातूनच काही लोकांनी आजपर्यंत आपापली पोळी भाजून घेतली आहे. आपापल्या जातीचा फायदा करुन घेतला आहे. निवडणुकीच्या काळात ते पोटतिडकीने सांगतात आणि निवडणुका संपल्या की तळागाळातील लोकांचे हाल होतात. पण, सामान्य माणसाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. मी कारण नसताना कोणाची स्तुती करत नाही.

त्यांनी काम केले असेल तर त्यांचा आदर्श घेतलाच पाहिजे. यापूर्वी कोणी का मन की बात बोललं नाही. आजपर्यंत मी अनेक पंतप्रधान जवळून बघितले. सगळ्यांचा विचार केला तर त्यांच्या त्यांच्या पातळीवर ते राहिले. प्रत्येकांनी छत्रपतींचे विचार सांगितले पण, ते अंमलात आणले नाहीत. काहींनी विचार सांगितले ते तसेच सोडून दिले. स्वत: केले नाही तर दुसऱ्याची वाट पहात बसलात तर कोण करणार. आदर्श घालून देण्याबाबत कोण सांगणार, असा प्रश्न त्यांनी केला.

जरांगे पाटलांना आपण समजावून सांगणार का, यावर उदयनराजे म्हणाले, मी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या वायाचा असतो तर मी माझ्यापरिने पावले उचलली असती. तर आज ही परिस्थिती नसती. त्यावेळी जे सत्तेत होते, त्यांनी हे करायला हवे होते. आता न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली आहे.

आज किती लोकांना आपण नोकऱ्या देऊ शकतो, असा प्रश्न करुन उदयनराजे म्हणाले, मी मोदीजींकडे विनंती केली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्त जास्त निधी सारथी संस्थेला द्यावा. जेणे करुन हे लोक तेथे शिकले पहिजेत. शिक्षणातून स्वावलंबी झाले पाहिजे. मेक इन इंडियातून हे सर्वजण मोठे झाले पाहिजेत. त्यांना संधी दिली तरच ते मोठे होणार आहे, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT