Shivsena Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shirdi Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिर्डीतील मोठा नेता बंडखोरीच्या तयारीत, काय आहे कारण?

Uddhav Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी भाऊसाहेब वाकचौरेंविरोधात बंड पुकारले आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीची लोकसभा जागावाटपाचा गोंधळ सुरू आहे. यातच दोन्ही बाजूने इच्छुकांची संख्या वाढली असली, तरी महायुतीत भाजपकडे, तर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उमेदवारीसाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे काही चित्र आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे असल्याने तेथील इच्छुकांची संख्या डझनच्या वर गेली आहे. यातच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश करून उमेदवारीची तयारी केली आहे. आता त्यांच्याविरोधात बंडखोरीचे निशाण ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे फडकवण्यास सुरुवात केल्याने यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. (Shirdi Politics)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड (Ashok Gaikwad) यांनी भाऊसाहेब वाकचौरेंविरोधात बंड पुकारले आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा देखील त्यांनी समाचार घेतला. याबाबत अशोक गायकवाड यांनी श्रीरामपूर येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. अॅड. मिलिंद गायकवाड, रवींद्र साठे, भीमजी साठे उपस्थित होते.

अशोक गायकवाड म्हणाले, "शिर्डीच्या साईबाबा, उध्दव ठाकरे आणि जनतेला फसविणारे पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे दावेदार, हे दुर्देव आहे. आपण शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून योग्य असल्याचे वरिष्ठांना पटवून दिले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास आपण बंड करणार असून अशा प्रवृत्ती गाडल्या गेल्या पाहिजे", असा थेट हल्ला माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांचे नाव घेत अशोक गायकवाड यांनी चढवला.

विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्यावर टीका करताना अशोक गायकवाड म्हणाले, "ते कधी मतदारसंघाकडे फिरकले नाहीत. या खासदारांना आपल्या मतदारसंघातील प्रश्नाचे मुद्दे संसदेत हिंदी भाषेत मांडता येत नाहीत, हे दुर्दैव आहे. दुसरे माजी खासदार यांना साधे चलता येत नाही. शंभर फूट चालल्यावर त्यांना सावलीचा आधार घ्यावा लागतो. जे स्वतःला सांभाळू शकत नाहीत, ते या मतदारसंघाचे नेतृत्व कसे करू शकतात".

वाकचौरे ही प्रवृत्ती, त्यामुळे विरोध

उध्दव ठाकरे (Uddhav Thaceray) यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिल्यास यांचा प्रचार करणार का?, यावर गायकवाड म्हणाले, "मी बंड पुकारून त्यांच्याविरुध्द शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवणे पसंद करेल. मी एक शेतकरी असून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी नेहमीच तत्पर असतो. उमेदवारीसाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. माझा व्यक्तीला विरोध नसून प्रवृत्तीला आहे. त्यांचे काम मी करणार नाही". उध्दव ठाकरे यांनी कोकणसह अन्य ठिकाणचे उमदेवार जाहीर केले. मात्र शिर्डीच्या उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे येथील उमेदवारी वाकचौरे यांनाच मिळेल, असे नाही. वाकचौरे यांच्या व्यतिरिक्त कोणाला उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करू, असेही गायकवाड स्पष्ट केले.

अजित पवार गटाचादेखील दावा

रामदास आठवले महायुतीतून उमेदवारी करणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. कारण ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महायुतीत ही जागा शिंदे गटाला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकेल, असे सध्या तरी वाटत नाही. अजित पवार (Ajit Pawar) गटानेही शिर्डी लोकसभा मतदारसंघात असलेले आमदार व साखर कारखान्याचा हवाला देत ही जागा मागितली असल्याचे अशोक गायकवाड यांनी दावा केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT