Beed News : सोशल मिडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्टेट्स ठेवल्याच्या रागातून एका तरुणाला दोघांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील लहूरी येथे घडली. जखमी गणेश नागनाथ चाळक या तरुणावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रकरणी दोघा जणांविरोधात शुक्रवार केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. केज तालुक्यातील लहूरी येथील गणेश नागनाथ चाळक याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोशल मिडीयाला स्टेटस ठेवले होते. गणेश चाळक एका हॉटेलसमोर बसलेला असताना गावातीलच राहुल सर्जेराव चाळक व कैलास सुरेश चाळक हे दोघे तेथे आले व तुझ्या सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे स्टेटस का ठेवलेस? असे म्हणत गणेश चाळक याच्या हाता व पायावर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अमोल इंदरराव चाळक, नागनाथ हरिभाऊ चाळक यांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद सोडविला. मात्र, गणेश चाळक जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.
पोलिस (Police) निरीक्षक प्रशांत महाजन व त्यांच्या सहकारी अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या गणेश चाळक याचा जवाब घेतला. या प्रकरणी राहुल सर्जेराव चाळक व कैलास सुरेश चाळक (दोघे रा. लहूरी, ता. केज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस जमादार राजू वाघमारे करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.