Shiv Sena chief Uddhav Thackeray addressing party members as internal dissent grows over the KP Patil decision.  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

KP Patil News : के.पी. पाटलांचा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार; पदाधिकाऱ्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त!

Uddhav Thackeray to Take Final Call on KP Patil : के.पी. पाटलांच्या घरवापसीच्या चर्चांनाही आलं उधाण ; जाणून घ्या, कोल्हापूरमधील ठाकरे गटाची काय आहे भूमिका

Rahul Gadkar

Kolhapur Shivsena UBT Party News : विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटात गेलेल्या माजी आमदार के पी पाटील यांची पुन्हा एकदा घरवापसीची चर्चा सुरू आहे. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असता के पी पाटील हे अजित पवारांसोबत दिसले. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गट चांगलाच संतापला आहे.

माजी आमदार के पी पाटील यांच्या विरोधात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त करताच सहसंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी के. पी. पाटील यांची तक्रार थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच करणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आज(गुरूवार) कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात के पी पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले.

विधानसभा निवडणुकीत के.पी.पाटलांना ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी दिली मात्र ते गेले. के.पी.पाटलांच काय आहे? ते समजत नाही. जे के.पी.पाटलांच चाललयं ते पक्षप्रमुखांच्या कानावर घालणार आहे. त्यानंतर के.पी.पाटलांचा निर्णय होईल, असा इशारा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज(गुरूवारी) झाली. पक्ष स्थानिक संस्थांच्या निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे. तर निवडणुका स्वतंत्र की, आघाडी म्हणून लढवायच्या याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील.

तसेच, चांगल काम असलेल्या भागात आपल्याला न्याय मिळावा अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. शिवसेनेमुळे मोठे होवून मलई खालेले सर्व जण गेले आहेत.मात्र जमिनीवरील शिवसैनिक जागेवर आहे. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हांचा निर्णय आमच्याबाजूने लागेल. ठाकरे गटात संघटनात्मक बदल होणार आहे, त्यासाठी चाचपणी सुरू असल्याचंही दुधवडकर यांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT