Prabhakar Gharge, Jaykumar Gore, Mahesh Shinde
Prabhakar Gharge, Jaykumar Gore, Mahesh Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vaduj APMC : प्रभाकर घार्गेंचे निर्विवाद वर्चस्व; राष्ट्रवादी, स्वाभिमानीला केवळ पाच जागा...

Umesh Bambare-Patil

-आयाज मुल्ला

Vaduj APMC News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे Prabhakar Gharge यांच्या नेतृत्वाखालील खटाव तालुका विकास आघाडीने १८ पैकी १३ जागा जिंकल्या. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस NCP व स्वाभिमानी शेतकरी संघटना Swabhimani Shetkari Sanghtna पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनेलला पाच जागा मिळाल्या. बाजार समितीवर घार्गे यांनी आपले वर्चस्व या निवडणूकीत पुन्हा सिध्द केले.

बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक झाली होती. राष्ट्रवादीचे दोन माजी मंत्री, तसेच आजी, माजी आमदार व स्थानिक मान्यवरांच्या सहभागामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. माजी आमदार घार्गे यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, रणजितसिंह देशमुख, डॉ. सुरेश जाधव, धैर्यशिल कदम, राहूल पाटील यांच्यासह कार्यकर्ते खटाव तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीच्या निवडणूकीसाठी झटत होते.

तर राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभीमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनेलसाठी माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, स्वाभीमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार आदी मान्यवर व कार्यकर्ते या निवडणूकीसाठी लढत होते. त्यामुळे ही निवडणूक दुरंगी व मोठी चुरशीची बनली होती.

खटाव तालुका विकास आघाडीचे मतदार संघनिहाय विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : प्राथमिक कृषी पतपुरवठा व बहुउद्देशिय संस्था- सर्वसाधारण मतदार संघ : महेश घार्गे (६३६ मते), अभिजीत देशमुख (६२६ मते), ज्ञानेश्वर नलवडे (६१७ मते), दत्तात्रय पवार (६१६ मते), राहूल फडतरे (६४७ मते), सुनिल फडतरे (६१२ मते), विजयकुमार शिंदे (६०२ मते).

महिला राखीव : सौ. लता जगदाळे (६४७ मते), सुनिता मगर (६२५ मते). इतर मागासवर्गीय राखीव : दीपक विधाते (६५६ मते). विमुक्त जाती भटक्या जमाती मागास प्रवर्ग राखीव : शरद पाटील (६३६ मते), ग्रामपंचायत सर्वसाधारण : आण्णा वलेकर (५३६ मते). ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : विनोद घार्गे (५४५ मते).

शेतकरी सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ : अभिजीत जाधव (५३९ मते). ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघ : शैलेंद्र वाघमारे (५४४ मते). व्यापारी व आडते मतदार संघ : संकेत म्हामणे (४२६ मते), गिरीष शहा (४२४ मते). हमाल मापाडी मतदार संघ : स्वप्नील घाडगे (३९५ मते). या निवडणूकीत २०६ मते अवैद्य ठरली.

फेरमतमोजणी अन्‌ अंगठ्यांची मते बाद.

खटाव तालुका विकास आघाडीचे ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघाचे उमेदवार अमरजित कांबळे यांना ५४० मते मिळाली. तर विरोधी राष्ट्रवादी व स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी सहकार पॅनेलचे उमेदवार शैलेंद्र वाघमारे यांना ५४३ मते मिळाली. त्यामुळे कांबळे यांनी फेर मतमोजणी मागणी केली. त्यामध्ये वाघमारे यांना ५४४ मते मिळाली. मात्र या दरम्यान कांबळे यांच्या मतपत्रिकेवर अंगठ्याच्या ठश्यांनी दिलेली पाच मते अवैद्य ठरली. त्यामुळे या फेर मतमोजणीची अन्‌ अंगठ्यांच्या बाद मतांची चर्चा सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT