Shivendraraje News : बाजार समिती ताो झाकी है, नगर पालिका अभी बाकी है... असा सूचक इशारा देत सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे आहे. ते ग्रहण नगरपालिकेतून सोडवायचं आहे, असं सांगत आमदार शिवेंद्रराजे भोसले shivendraraje Bhosale यांनी खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale यांचा खरपूस समाचार घेतला.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनलने खासदार उदयनराजे भोसले यांनी पुरस्कृत केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलचा पराभव केला. यानंतर आमदार शिवेंद्रराजेंनी पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजेंचा समाचार घेतला.
शिवेंद्रराजे म्हणाले, नुसतं घराण्याचं नाव आणि घराण्याच्या नावावर मत मिळवण्याचे दिवस उदयनराजे यांचे संपले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावं. स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करत राहणं ही पद्धत त्यांनी बंद करावी. उदयनराजेंनी सातारकरांसाठी काहीतरी करून दाखवावं, असे आव्हान त्यांनी केले.
ही निवडणूक उदयनराजेंनी शेतकरी संघटनेचा मुखवटा घालून लढवली होती. सातारा विधानसभा, कोरेगाव आणि कराड येथे उदयनराजेंची काय ताकद राहिली आहे? हे या निकालातून दिसून येत आहे. बाजार समिती ताो झाकी है, नगर पालिका अभी बाकी है... असा सूचक इशारा देऊन सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे आहे. ते ग्रहण नगरपालिकेतून सोडवायचं आहे.
भाऊसाहेब महाराजांवर लोकांचा विश्वास असून आम्ही गावोगावी केलेली विकासाची कामे पाहून लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. मार्केट यार्डमधील जमिनीबाबत उदयनराजेंनी केलेला डाव आम्ही हाणून पाडलाय. मार्केट कमिटीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न उदयनराजे करत होते. त्याला आम्ही टोकाचा विरोध केला.
तोडपाणी करणारे पदाधिकारी
उदयनराजेंची ताकद पहिल्या दिवसापासून नव्हती म्हणून स्वतः पुढे न येता शेतकरी संघटनेला उदयनराजेंनी पुढे केलं. राजू शेट्टींनी त्यांची संघटना उदयनराजेंच्या दावणीला बांधण्याचं काम केलं आहे. राजू शेट्टी यांनी तोडपाणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांबाबत निर्णय घ्यावा. लोकांचा स्वाभिमानी संघटनेवर विश्वास राहील असे पदाधिकारी राजू शेट्टींनी तयार करावेत, असे सांगत राजू शेट्टी Raju Shetty यांच्यावर देखील टीकास्त्र डागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.