Valmik Karad-Uttam Jankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Valmik Karad : वाल्मिक कराडने 32 खून केलेत; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप...

Uttam Jankar News : बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानमधील कंधारपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. बीड येथील राजकीय नेत्यांनी काही गुंडांना हाताशी धरून मोठी दहशत पसरवली आहे.

Vijaykumar Dudhale

Pandharpur, 21 December : बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानमधील कंधारपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. बीड येथील राजकीय नेत्यांनी काही गुंडांना हाताशी धरून मोठी दहशत पसरवली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्यादेखील याच राजकीय गुंडांकडून करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड नावाच्या व्यक्तीने 32 खून केले आहेत. इतकी या माणसाची प्रचंड दहशत आहे. हा वाल्मीक कराड (Valmik Karad ) मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार आज (ता. 21 डिसेंबर) मस्साजोग येथे जाऊन सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) कुटुंबाची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार उत्तम जानकर यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्यामध्ये सुमारे 3200 लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अनेक आयएएस अधिकारी वाल्मीक कराड याच्या घरासमोर दरबार भरवतात. इतकी मोठी प्रचंड दहशत या वाल्मीक कराडची आहे. त्याला मंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय पाठबळ आहे. त्यामुळे वाल्मीक कराड याची दहशत वाढत गेली आहे, असेही जानकर यांनी सांगितले

वाल्मीक कराड याची दहशत ही काही अलीकडची नाही. देवेंद्र फडणवीस मागील सात वर्षांपासून सत्तेत आहेत, ते स्वतः गृहमंत्री आहेत. त्यांच्याच काळात बीड जिल्ह्यात या लोकांची दहशत सुरू आहे. अशा लोकांविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशाराही आमदार उत्तम जानकर यांनी दिला आहे.

दरम्यान, संतोष देशमुख खून प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. माझ्याशी संबंधित लोकांवर विधानसभेत चर्चा होत असताना मी सभागृहात उपस्थित राहणं उचित नाही, त्यामुळे गेली दोन ते तीन दिवस मी सभागृहात उपस्थित नव्हतो, असे स्पष्टीकरण दिले. तसेच, संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT