Assembly Session : संसदेत अमित शाहांची बॅलेटची मागणी मान्य करता; मग मारकडवाडीत ‘बॅलेट’वर का मतदान घेत नाही?

Nana Patole News : तुमचा एक आमदार शपथ घेत असताना काय बोलत होता. मी निवडून आलो नाही तरी मी शपथ घेतो की...असं तुमचा आमदार शपथ घेताना बोलला. आता तो आमदार कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 20 December : संसदेत ‘वन नेशन वन इलेक्शन’वर बॅलेटवर मतदान घेण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मागणी मान्य करण्यात आली. पण मारकवाडीची जनता स्वखर्चाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत आहे. आंदोलन करत आहे, तरीही तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान का घेत नाही, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला.

विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी मारकडवडी, बॅलेट पेपर आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या मुद्यावर सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते म्हणाले तुम्हाला ‘डबल इंजिन’चे सरकार पाहिजे होते. आता आलं ना डबल इंजिन सरकार. सत्ताधारी बाकावरून आताच कोणीतरी म्हणाले आमचे २३७ आमदार निवडून आले आहेत. माझं तुम्हाला चॅलेंज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले, त्यावेळी त्यांनी मारकडवाडीबाबत भाष्य केले आहे.

मारकडवाडीतील (Markadwadi) ग्रामस्थांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने धमकावलं आहे. मी स्वतः मारकडवाडीला जाऊन आलो आहे. मारकडवाडीला सरकारच्या माध्यमातून ‘मॉक पोल’ करायचं आहे. तुम्ही म्हणता ते निवडणूक आयोगाचे काम आहे. पण, मारकडवाडीचे ग्रामस्थ तर आपल्या खर्चाने ‘मॉक पोल’ करत होते. तो ‘मॉक पोल’ तुम्ही थांबवला. दूध का दूध आणि पानी का पानी करायचं असेल तर करून दाखवा, असे आवाहनही पटोले यांनी केले.

Nana Patole
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी सांगितले विधानसभेत गैरहजर राहण्याचे कारण...

पटोले म्हणाले, तुमचा एक आमदार शपथ घेत असताना काय बोलत होता. मी निवडून आलो नाही तरी मी शपथ घेतो की...असं तुमचा आमदार शपथ घेताना बोलला. आता तो आमदार कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे. तुमचे अनेक आमदार ७५ हजार, एक लाख मतांनी कसं निवडून आलो, असे सांगून स्वतःला चिमटे काढतात. एकांतात आम्हाला सांगतात. मारकडवाडीत एकदा शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर मतदानाचा प्रयोग करा. त्यातून तुम्हाला समजेल की तुम्ही लोकांच्या मतातून निवडून आलात की गडबडीतून निवडून आला आहात, ते कळेल.

संसदेत ‘वन नेशन आणि वन इलेक्शन’वर मतदान घेण्यात आले. त्यात इलेक्ट्रॉनिक मशीनवर सरकारच्या बाजूने २६३ मते मिळाली आहेत. त्यानंतर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘बॅलेट पेपर’वर घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीह बॅलेट पेपरवर मतदान करण्याची सूचना केली. त्यानुसार घेण्यात आलेल्या मतदानात सरकारची मते वाढली, असेही पटोले यांनी नमूद केले.

Nana Patole
Maharashtra Politic's : महायुतीच्या खाते वाटपासंदर्भात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे मोठे भाष्य

ते म्हणाले, लोकसभेत ‘वन नेशन आणि वन इलेक्शन’च्या मतदानासाठी बॅलेटची मागणी करण्यात आली, ती तातडीने मंजूर करण्यात आली. पण, जनता बॅलेट पेपवर मतदान घेण्याची मागणी करत असताना तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान का घेत नाही. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या ना. मारकडवाडीत बॅलेट पेपरचा प्रयोग करून तर बघा ना, असे आवानही नाना पटोले यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com