Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात चौथ्या आरोपीला अटक!

Fourth Accused Arrested in Deshmukh Case : हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप विष्णू चाटे याच्यावर असून तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Vishnu Chate | Santosh Deshmukh
Vishnu Chate | Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या खून प्रकरणाची महाराष्ट्रातचं नाही, तर दिल्ली आणि संसदेतही चर्चा होऊ लागली आहे. इकडे नागूपरच्या हिवाळी अधिवेशना या खून प्रकरणात राजकीय कनेक्शन उघड होत असल्याने वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात एकमेकांवर तुटून पडले आहेत.

सरकारने सीआयडीकडे तपास सोपवत एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. (Beed News) सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल झाले असून पोलीसांनी या खून प्रकरणात आता चौथ्या आरोपीला अटक केली आहे. विष्णू चाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर सरपंच संतोष देशमुख हत्या आणि पवनउर्जा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Vishnu Chate | Santosh Deshmukh
Beed Crime News : मुख्यमंत्री फडणवीस यांची सभागृहात घोषणा अन् सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल!

हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप विष्णू चाटे याच्यावर असून तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. काही दिवसापुर्वीच त्याची पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचे कारण देत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज चाटे याला ताब्यात घेतल्यामुळे या खून प्रकरणातील चौथा आरोपी आता अटकेत आहे.

Vishnu Chate | Santosh Deshmukh
Beed NCP News : खून अन् खंडणी प्रकरणात आरोप होताच चाटेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी!

सरपंच संतोष देशमुख यांचा खून 9 डिसेंबर रोजी झाला होता. आतापर्यंत या प्रकरणात पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली होती. आज खूनाच्या नवव्या दिवशी विष्णू चाटे या चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह इतर दोघे अजूनही फरार असून त्यांच्या मागावर पोलिसांचे पथके रवाना करण्यात आली आहेत.

Vishnu Chate | Santosh Deshmukh
Nagpur Winter Session : सुर्यवंशी, देशमुख प्रकरणी विरोधक आक्रमक...पाहा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काय घडलं

सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी केज जवळून अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला. दरम्यान अपहरणानंतर विष्णू चाटे सरपंच देशमुख यांचा धनंजय यांच्या संपर्कात होता. 'तुमच्या भावाला आणून सोडायला लावतो', असे तो सांगत होता. मात्र, संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळल्यानंतर सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे यांच्यावर गुन्हा नोंद झाला.

Vishnu Chate | Santosh Deshmukh
NCP Politic's-video : मंत्रिमंडळातील एक जागा कोणासाठी रिक्त ठेवली?....राष्ट्रवादीच्या नेत्याने थेट नावच घेत डेडलाईनही सांगितली...

त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटेवरही गुन्हा दाखल झाला होता. विष्णू चाटे हा केज तालुक्यातील कवडगावचा पूर्वी सरपंच होता अशी माहिती आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सह आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने चाटे याची तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com