Dhananjay Munde News : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले जात आहेत. धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर देखील आरोप होत आहेत. या प्रकरणात प्रथम माध्यमांच्या समोर येत धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, ज्या प्रकारे हत्या झाली याचे समर्थन कोणी करू शकत नाही. सगळेच आरोपींना अटक झाली आहे. सगळ्यांचा भावना तीव्र आहेत.शेवटपर्यंत याचा तपास होणार आहे. जे गुन्हेगार आहेत. त्याचा भाऊ आहे हे पोलिसांसोबत चहा पित असताना समोर आले आहे. या सगळ्यांचा तपास यंत्रणा लावेल.ज्या कुणी आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केली त्यांना फाशी झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे.
'मकोका लावण्याबाबत मुख्यमंत्री बोलले आहे. या प्रकरणात लावायचा आहे. खऱ्या लोकांनाही मकोका लागला पाहिजे, या भूमिकेचा मी आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत निवेदन केले आहे त्यामुळे सगळ्यांचे समाधना झाले आहे.', असे देखील मुंडे यांनी सांगितले.
धनंजय मुंडे यांच्यावर देखील या प्रकरणात आरोप होत आहेत. त्यामुळे यावर बोलताना ते म्हणाले, माझे आरोपीशी नाव जोडणे हा प्रकार सदनात अनेकदा घडला आहे. पोलिस तपास करत आहेतच त्यामुे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.
विरोधी पक्षाकडून संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांना वाचवले जात असल्याचे आरोप केला जात आहे. ते नागपूरमध्ये असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, वाल्मिक कराड कुठे आहेत हे जर विरोधी पक्षांनी सांगितले असते तर पोलिसांनी त्यांना अटक केली असती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.