Dr. Vishwajeet Kadam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali News : विश्वजित कदम यांचा इशारा; आरफळ, कृष्णा कालव्यात पाणी सोडा, अन्यथा...

Vishwajeet Kadam पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत दोन वेळा बैठका, तसेच मंत्र्यांसोबत कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. तरीही पाटबंधारे विभागाने सांगलीला पाणी सोडले नाही, असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.

Anil Kadam

Sangali News : पलूस तालुक्यात आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने पिण्याचे व जनावरांच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पिके वाळली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आरफळ योजना व कृष्णा कालव्यात तत्काळ पाणी सोडा, अन्यथा शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिला आहे.

आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, आरफळ योजनेचे पाणी पलूस तालुक्यातील आंधळी, मोराळे बांबवडे, सांडगेवाडी, कुंडल आणि पलूसच्या काही भागात जाते, तर कृष्णा कालव्याचे पाणी पलूस तालुक्यातील तुपारी ते वसगडेपर्यंत जाते. तालुक्यातील बहुतांश शेती ही आरफळ व कृष्णा कालव्यावर अवलंबून आहे.

मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने शेती धोक्यात आली आहे. सध्या ऊस, द्राक्षे, केळी, भाजीपाला, फुले व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडणेसंबंधी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रे दिली, निवेदने दिली.

पाटबंधारे अधिकाऱ्याबरोबर दोन वेळा बैठका व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत कालवा सल्लागार समितीची एक वेळ बैठक झाली. शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्यासाठी पाणी देणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगितले. मात्र, अद्यापही पाटबंधारे विभागाने पाणी सोडले नाही, असे आमदार डॉ. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरफळ योजनेत धरणातील पाणी सोडण्यासाठी अगदी अल्प काम बाकी आहे. ते प्रशासनाने तातडीने पूर्ण करावे. आरफळ व कृष्णा कालव्याला पाणी नसल्याने विहिरी व कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने आरफळ योजना व कृष्णा कालव्यात तातडीने पाणी सोडावे, अन्यथा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोर्चा काढण्याचा इशारा आमदार कदम यांनी दिला.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT