Vita Nagarpalika Election 2025: विटा नगरपालिकेत भाजपच्या माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची तब्बल ५० वर्षांची सत्ता उलथून लावत शिवसेना आमदार सुहास बाबर यांनी भगवा फडकवला. नगराध्यक्षपदासह शिवसेनेचे तब्बल 22 नगरसेवक विजयी झाले. बाबर गटाने सत्ता काबीज केल्यानंतर शहरात एकच जल्लोषी वातावरण तयार झाले आणि बाबर समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
सुहास बाबर यांनी नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर आज विटा शहरात बाबर समर्थकांनी एकच जल्लोष केला. येथील खानापूर रस्त्यावरील बळवंत कॉलेजच्या इनडोअर स्टेडियममध्ये नगराध्यक्ष व नगरसेवकपदांची मतमोजणी झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार काजल म्हेत्रे मताधिक्यात आघाडीवर होत्या. त्यामुळे जसजसे मताधिक्याचे आकडे वाढू लागले. तसतसे बाबर समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.
दुसऱ्या फेरीमध्ये नगरसेवक पदांच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्यानंतर जास्त जल्लोषाला सुरुवात झाली. अखेर दुपारी साडेबारा वाजता निकाल जाहीर होऊन शिवसेनेचा नगराध्यक्ष व 22 नगरसेवक निवडून आल्याचे घोषित करताच बाबर समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करणे सुरुवात केली. त्यानंतर डॉल्बीच्या निनादात खानापूर रस्त्यावरील बळवंत कॉलेज पासून विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला.
आमदार सुहास बाबर, विजयी उमेदवार अमोल बाबर यांच्यासह अन्य उमेदवार जल्लोषी मिरवणुकीत सहभागी झाले होते. आपआपल्या उमेदवारांचे छोटे-छोटे फलक हातात घेऊन त्यांचे समर्थक जल्लोष करत होते. या मिरवणुकीत महिलांची संख्या लक्षणे होती. महिलाही ठिकठिकाणी गुलाब पाकळ्यांची उधळण करून आनंद उत्सव साजरा करीत होत्या. बळवंत कॉलेजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईपर्यंत रस्ते गुलालाने नाहून गेले होते. सर्वत्र गुलालाचा खच पडला होता.
विटा शहरातील मुख्य रस्त्यावरून तसेच उपनगरातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. ज्या ज्या प्रभागातून उमेदवार निवडून आले आहेत. त्या प्रभागातील मतदारांनी आपापल्या उमेदवारांचे जल्लोषी स्वागत केले. शहर व सर्व प्रभागात रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला जात होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.