Solapur Bazar Samiti Eletion Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Bazar Samiti Eletion : सोलापूर बाजार समितीसाठी ‘या‘ आठ मतदान केंद्रांवर रविवारी होणार मतदान

Solapur Political News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार आमने सामने आले आहेत. दोन्ही देशमुख प्रथमच एकत्र आले असून त्यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी हे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्यासोबतीने लढत आहेत

Vijaykumar Dudhale, प्रमोद बोडके

Solapur, 21 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार आमने सामने आले आहेत. दोन्ही देशमुख प्रथमच एकत्र आले असून त्यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी हे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्यासोबतीने लढत आहेत. या आठवड्यात बाजार समितीचे राजकारण वेग घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोलापूर बाजार समितीचे (Solapur Bazar Samiti) 18 संचालकांच्या निवडीसाठी येत्या रविवारी (ता. 27 एप्रिल) सकाळी 08 ते सायंकाळी 05 या वेळेत मतदान होणार आहे. बाजार समितीसाठी एकूण 08 मतदान केंद्रे असणार आहेत. सहकारी संस्था व ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी व हमाल-तोलार मतदारसंघासाठी 08 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली.

सोलापूर शहरातील (Solapur) सिध्देश्वर पेठेतील सिध्देश्‍वर प्रशालेतील (पासपोर्ट कार्यालयाजवळ) मतदान केंद्रात एकरूख, कुमठे, केगांव, खेड, गुळवंची, दहिटणे, देगांव, बाणेगांव, बाळे, भोगांव, मजरेवाडी, शेळगी, सोरेगांव, सोलापूर, हगलूर, हिप्परगे, होनसळ, राळेरास या गावातील मतदार मतदान करणार आहेत.

तिऱ्हे येथील मतदान केंद्रावर बेलाटी, कवठे, कोंडी, डोणगाव, तिऱ्हे, तेलगांव, नंदूर, पाकणी, शिवणी, पायरी, हिरज येथील मतदारांना मतदान करता येणार आहे.

नान्नज येथील मतदान केंद्रावर मार्डी, रानमसले, वडाळा, वांगी, अकोलेकाटी, कळमण, कारंबा, कौठाळी, गावडी दारफळ, नरोटेवाडी, नान्नज, पडसाळी, बीबी दारफळ, साखरेवाडी, भागाईवाडी, सेवालाल नगर येथील मतदार मतदान करणार आहेत.

निंबर्गी येथील मतदान केंद्रावर कुसूर, आंत्रोळी, खानापूर, तेलगाव, निंबर्गी, बाळगी, भंडारकवठे, लवंगी, वडापूर, विंचूर, शंकरनगर, सादेपूर, कंदलगाव, कारकल, गुंजेगाव, माळकवठे येथील मतदार मतदान करणार आहेत.

मंद्रूप मतदान केंद्रामध्ये चिंचपूर, हत्तरसंग, होनमुर्गी, अकोले मंद्रप, औज मंदुए, औराद, कुडल, कुरघोट, टाकळी, नांदणी, बरूर, बसवनगर, बोळकवठे, मंद्रूप, मनगोळी, येळेगांव, वडकाबाळ, वांगी, गावडेवाडी येथील मतदार मतदान करणार आहेत.

आहेरवाडी येथील मतदान केंद्रावर इंगळगी, कणबस (र्ग), हत्तुर, हिपळे, होटगी (सा), होटगी स्टेशन, आलेगांव, आहेरवाडी, औज (आ), तिल्हेहाळ, फताटेवाडी, बंकलगी, बोरूळ, मद्रे, राजूर, शिरवळ, संजवाड, सिंदखेड, घोडातांडा येथील मतदार मतदान करणार आहेत.

वळसंग येथील मतदान केंद्रावर कर्देहळ्ली, दिंडूर, हणमगाव, आचेगाव, कुंभारी, तीर्थ, तोगराळी, धोत्री, येत्नाळ, रामपुर, लिंबी चिंचोळी, वडगाव-शिर्पनहळी, वळसंग, शिंगडगाव येथील मतदार मतदान करणार आहेत.

बोरामणी येथील मतदान केंद्रावर कासेगांव, दर्गनहळ्ळी, दोड्डी, उळे, उळेवाडी, गंगेवाडी, तांदुळवाडी, पिंजारवाडी, बक्षीहिप्परगे, बोरामणी, मुळेगांव, मुळेगांव तांडा, मूस्ती, वडजी, वरळेगांव, संगदरी येथील मतदार मतदान करणार आहेत. व्यापारी व हमाल तोलार मतदार संघासाठी सिध्देश्वर प्रशालेत मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT