Eknath Shinde Solapur Tour : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापूर दौरा रद्द; सावंत कुटुंबातील ‘हे’ कारण चर्चेत....

Shivsena Political News : माढा येथे उभारण्यात येणाऱ्या राजवी ऍग्रो ऑइल इंडस्ट्रीजचे भूमिपूजन आणि शिव मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज माढ्यात येणार होते. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 April : शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे शिंदे यांचा माढा दौरा रद्द झाला आहे. शिंदे यांचा दौरा रद्द होण्यामागे सावंत कुटुंबातील गृहकलह आहे की दुसरे कोणते कारण आहे, याची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात होताना दिसून येत आहे.

माढा येथे उभारण्यात येणाऱ्या राजवी ऍग्रो ऑइल इंडस्ट्रीजचे भूमिपूजन आणि शिव मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज माढ्यात येणार होते. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावंत कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्यात हा कार्यक्रम होणार होता

या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते. शिवाजी सावंत (Shivaji Sawant) आणि कुटुंबीयांकडून या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून शिंदे यांचा नियोजित सोलापूर दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे, त्यामुळे आयोजकांचा हिरमोड झाला असून त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

Eknath Shinde
Rohit Pawar : रोहित पवारांनी ‘आदिनाथ’च्या निवडणुकीत विरोधात प्रचार का केला? आमदार नारायण पाटलांनी ‘त्या मुद्या’लाच हात घातला

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांचा हा सोलापूर दौरा महत्वपूर्ण मानला जात होता. पक्षबांधणीच्या दृष्टीने या मेळाव्याकडे पाहिले जात होते. तसेच सावंत कुटुंबीयांच्या विशेषतः शिवाजी सावंत यांच्या दृष्टीने ही शिंदे यांचा हा दौरा विशेष महत्वपूर्ण होता. मात्र, ऐनवेळी शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याने शिवाजीराव सावंत यांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.

Eknath Shinde
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर आत्महत्याप्रकरणी आरोपीच्या वकिलाचा मोठा आरोप; ‘वस्तुस्थिती वेगळी, ती बाहेर येऊ नये; म्हणून...’

दुसरीकडे सावंत कुटुंबीयांत वाद असल्याची चर्चाही या निमित्ताने रंगली आहे. एकनाथ शिंदे हे सावंत यांच्या तालुक्यात येत असूनही शिवसेनेच्या मेळाव्यात बॅनरवर अथवा जाहिरातीमध्ये तानाजी सावंत यांचा कोठेही फोटो नसल्याचे दिसून येत आहे, त्यातून सावंत कुटुंबीयांत सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला विशेष महत्व होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com