Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar, Srinivas Patil, Makrand patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan News : रामराजेंना दिल्लीला पाठविण्यासाठी सर्वांची साथ हवी : अजित पवार

Ramraje Naik Nimbalkar विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त फलटण येथे त्यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Umesh Bambare-Patil

Phaltan City News : रामराजे यांनी राज्यातील सर्व पदे भोगली आता त्यांना दिल्लीला पाठविण्यासाठी आपणा सर्वांची साथ हवी आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सूचना मांडली. त्यास विरोधी पक्ष नेता म्हणून माझे त्यास अनुमोदन आहे. त्यामुळे याबाबत आपण सर्वांनी जर शरद पवारसाहेब यांच्याकडे मागणी करूया ते नक्की ऐकतील, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त फलटण येथे अभीष्टचिंतन सोहळ्यात श्री. पवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विक्रमसिंह पाटणकर, आमदार दीपक चव्हाण, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, सुनील भुसारा, शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सुनील माने, संजीवराजे नाईक निंबाळकर, सत्यजित पाटणकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, बाळासाहेब सोळसकर, शिवरूपराजे खर्डेकर, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विधान परिषद अस्तित्वात आल्यानंतर जे सभापती अभ्यासू होते. ज्यांच्या शब्दाला सत्तारूढांबरोबरच विरोधकांमध्येही किंमत होती. सगळे त्यांचे ऐकत होते असे मोजकेच सभापती झाले, अशा सभापतींमध्ये रामराजे यांचा वरचा क्रमांक लागतो, असे निदर्शनास आणून देत श्री. पवार म्हणाले, ‘‘लोकांमध्ये इच्छाशक्ती असेल व नेतृत्वामध्ये धमक असेल तर काय घडते, हे रामराजे यांच्या रूपाने दिसून आले आहे.

१९९५ मध्ये राज्यात ४५ आमदार अपक्ष निवडून आले. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील २२ आमदारांचा समावेश होता. कुठल्याही पक्षाकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नव्हते; परंतु कृष्णा खोऱ्याची स्थापना करा तरच आम्ही पाठिंबा देऊ, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. त्याचे नेतृत्व रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. रामराजे यांनी राज्यातील सर्व पदे भोगली आता त्यांना दिल्लीला पाठविण्यासाठी आपणा सर्वांची साथ हवी आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सूचना मांडली. त्यास विरोधी पक्ष नेता म्हणून माझे त्यास अनुमोदन आहे. त्यामुळे याबाबत आपण सर्वांनी जर शरद पवारसाहेब यांच्याकडे तशी मागणी केली तर ते नक्की ऐकतील.’’

जयंत पाटील म्हणाले, ‘‘सातारा जिल्ह्याचे खरे भगीरथ हे रामराजेच आहेत. त्यांना सभापतिपदी पदावरून बदलू नयेत, अशी इच्छा सर्वच पक्षाची होती. रामराजे यांनी कधीही राजेशाही थाट कोणालाही कधीच दाखवला नाही. आता आगामी काळामध्ये रामराजेंनी आपले नेतृत्व आता दिल्लीमध्ये जाऊन केले पाहिजे; अशी आमची इच्छा आहे. राजेंना आता दिल्लीला पाठवले पाहिजे. रामराजे यांच्यासारख्या चांगल्या नेतृत्वाला देश पातळीवर जाण्याचे काम करण्याची गरज आहे. रामराजे यांच्या सोबत संजीवराजे यांनाही आता पक्ष ताकद देईल.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT