Chetan Narote Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : स्वीकृत नगरसेवक निवडीविरोधात आम्ही कोर्टात जाणार : काँग्रेस नगरसेवकाचा इशारा

Nominated corporator News : सोलापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून वाद वाढला. चेतन नरोटे यांनी भाजप नेतृत्वावर टीका करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला. सात नावे जाहीर केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 20 February : सोलापूरच्या जनतेने भाजपला मोठे बहुमत दिलं. पण त्यांना सभागृह चालवता येत नाही, असं दिसतंय. कारण पहिल्याच दिवशी महापौर आणि सभागृह नेत्यांनी पळ काढून पळपुटे नाव कमावले. स्वीकृत नगरसेवकांची सातच नावे जाहीर केली आहेत. त्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊन या निवडीवर स्टे आणणार आहोत, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक चेतन नरोटे यांनी दिला.

चेतन नरोटे (Chetan Narote) म्हणाले, पालकमंत्री आणि इथल्या नेत्यांकडून स्वीकृत नगरसेवकांची यादी अंतिम न झाल्याने फक्त सातच नावे सभागृहात जाहीर करण्यात आली. पुढची निवड झाली नाही. अजेंड्यावर जे विषय होते, ते टाळून माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांच्या दुखाट्याचा प्रस्ताव जाहीर करून ते निघून गेले आहेत.

शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे म्हणाले, भाजपच्या (BJP) वाट्याला स्वीकृत नगरसेवकाच्या नऊ जागा आल्या आहेत. त्यानुसार सभागृह नेत्यांनी भाजपची नऊ नावे जाहीर करतो, असे सांगितले. पण त्यांनी केवळ सातच नावे जाहीर केली. त्यांना दोन नावे जाहीर करता आली नाहीत. स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छूक असलेल्या भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मला मेसेज आला. माझं नाव स्वीकृत नगरसेवकाच्या यादीत आली नाही आणि आठ नावं वाचली आहेत. नववं नाव माझं होतं. ते कट झालं आहे, त्यामुळे मी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आत्महत्या करेन.

भाजप कार्यकर्त्याचा तो मेसेज महापौर, सभागृह नेते आणि मला सांगितलं की माझा आवाज म्हणून तुम्ही सभागृता बोला, असं त्या भाजप कार्यकर्त्यानं मला सांगितलं. बालाजी सरोवरमध्ये रात्रभर बसून काही गोष्टी घडत आहेत आणि पालकमंत्री सांगतात की, मी एकहाती सत्ता आणली आहे. एकहाती सत्ता आणली तरी सभागृह एक तास चालवू शकत नाही. पहिल्याच सभेत तुम्हाला सभागृह चालवता आलेलं नाही. कशाला मोठमोठ्या गोष्टी बोलता, असा सवाल अमोल शिंदे यांनी केला.

ते म्हणाले, आजच्या सभेत भाजपच्या दाव्यानुसार त्यांचे नऊ, तर एमआयएमचा एक अशा दहा स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर होणे अपेक्षित होतं. तरच त्या प्रस्तावाला मान्यत होत होती. पण त्यांनी तसं न करता सातच लोकांची नावं जाहीर केली आहेत. दोन लोकांची नावं हॉटेलमधून सभागृहात येईपर्यंत कट केली आहेत, असं सांगितलं जात आहे.

आजची सभा बेकायदेशीर

मला संधी न मिळण्यामागे पालकमंत्री, इथला आमदार आणि महापौर असे तिघे माझ्या आत्महत्येला कारणीभूत असतील, असा मेसेज त्यांनी केलेला आहे. महापौरांनी तो मेसेज आमदारांना सांगितल्यावर त्यांनी सभात्याग करून पलायन केले. नियमानुसार सभा संपण्याआधी स्वीकृतची दहा नावे एकमताने किंवा बहुमतांनी मंजूर करायला हवी होती. पण ती झाली नाहीत, त्यामुळे आजची सभा बेकायदेशीर आहे, असा आरोप शिंदे यांनी केला.

तोपर्यंत तुमची नावं यादीत येणार नाहीत

कोण म्हणतंय रात्रीपर्यंत माझं नावं होतं. कोणी म्हणतंय देवेंद्र फडणवीस, कोण म्हणतंय चंद्रकांतदादांनी माझं नाव दिलं होतं, तर कोण म्हणतंय चंद्रशेखर बावनकुळेंनी माझं नाव सुचवलं होतं. पण इथला छोटू आमदार आणि पालकमंत्री जोपर्यंत नावं सुचवणार नाहीत, तोपर्यंत तुमची नावं कोणत्याही यादीत येणार नाहीत, असा हल्लाबोल शिवसेना गटनेते अमोल शिंदे यांनी केला. नगरसेवक शिंदे म्हणाले, पाणीप्रश्न, रमजान या विषयावर आम्हाला बोलायचं होतं. पण त्यांना सभागृह चालवता आलेलं नाही. ते सभात्याग करून पळून गेलेले आहेत. याचा मी शिवसेनेचा गटनेता म्हणून निषेध करतो.

पालकमंत्री महोदय, तुम्हाला हात जोडून विनंती

हॉटेलमध्ये बसून तुम्ही सभागृह चालवत असाल तर पालकमंत्री महोदय, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जिल्ह्याचा कारभार चालवा. पण महापलिकेत असे चुकीचे पायंडे पाडू नका. सोलापूरकर तुम्हाला आधीच त्रस्त झालेले आहेत, असेही अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT