mahesh shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahesh Shinde : भाजपच्या बड्या नेत्याचा शिवसेना आमदाराला शब्द : महेश शिंदे जी भूमिका घेतील, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू...

Jaykumar Gore Big Statement : साताऱ्यात शिवसेनेतील वाद चिघळला असून महेश शिंदे यांनी शंभूराज देसाईंवर टीका केली. जयकुमार गोरे यांनी शिंदेंना पाठिंबा देत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 20 April : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आणि सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून जिल्ह्याच्या शिवसेनेत मोठा वाद निर्माण झाला आहे. मेळाव्याचं निमंत्रण आणि बॅनवर फोटा नसल्यामुळे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरच हल्लाबोल केला. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळे आपण शिवसेनेकडून लढलो, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला, त्यामुळे शिंदे हे भाजपच्या जवळ गेल्याचे मानले जात आहे.

त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी महेश शिंदेंबाबत मोठं विधान केलं आहे, ‘ते जी भूमिका घेतील, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू’, असा शब्दच त्यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिंदे हे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांचा मतदारसंघ असलेल्या कोरेगावमधील अंगार येथे जाणार आहेत. तसेच, साताऱ्यात पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांची बैठक आणि रात्री सभा होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाचे आमदार शिंदे यांना निमंत्रण नाही, त्यामुळे ते संतापले आहेत. त्यातून त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना विचारले असता त्यांनी महेश शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ते म्हणाले, शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची भूमिका काय असावी, हा त्यांचा अधिकार आहे. तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही आमदार महेश शिंदे यांचे हितचिंतक आहोत. आमच्या सहकारी पक्षाचे ते आमदार आहेत. आमचे मित्र आहेत.

आमदार महेश शिंदे आगामी काळात जी भूमिका घेतील, त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असा शब्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीररित्या दिला. तसेच, आम्ही दिवसातून दोन वेळा बोलतो, त्यामुळे संपर्कात असायचं काय कारण आहे, असे सांगून सातारा जिल्हा परिषदेतील शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या मदतीच्या भूमिकेबाबत परतफेडीचे पाऊल घेतल्याचे मानले जात आहे.

आमदार महेश शिंदे काय म्हणाले होते?

शंभूराजे देसाई मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देतात. ते कोणत्याही कार्यक्रमांना मला बोलावत नाहीत, असा आरोप शिंदे यांनी केला. पाच वर्ष पालकमंत्रीपद असूनही 30 सदस्यांपर्यंत पोहोचता आलं नाही, असं म्हणत त्यांनी थेट देसाई यांच्यावर निशाणा साधला.

एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील दौऱ्यासाठी आणि कार्यक्रमासाठी बोलावलेच नाही, फोनही आलेला नाही. तर हा शिवसेनेचा हा पहिला कार्यक्रम नाही की ज्याला मी जाणार नाही. साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवर नसतात, असं म्हणत जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे, असा सवालही शिंदेंनी उपस्थित केला. कोरेगावमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मला शिवसेनेच्या चिन्हावर लढायला सांगितले, त्यामुळे मी शिवसेनेतून लढलो, असा उल्लेख शिंदेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT