म्हसवड : माण तालुक्यात होणारा कॉरिडॉर एमआयडीसी प्रकल्प म्हसवडऐवजी फलटण मतदारसंघात नेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यांना माझे एकच सांगणे आहे की, माझ्या मतदारसंघातील प्रकल्पच काय पण, साधे कसपाटही मी बाहेर जाऊन देणार नाही. हा प्रकल्प म्हसवड येथेच होणार आहे, असे ठाम मत भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे.
माण व खटाव या दुष्काळी तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गेली १५ वर्षांपासुन सतत प्रयत्न करीत आहे, असे सांगून आमदार जयकुमार गोरे म्हणाले, माझ्या या प्रयत्नामुळेच म्हसवड शहरात कॉरिडॉर एमआयडीसी मंजुर केली आहे. हाच प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठीच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रकल्प इतर ठिकाणी गेल्याचा कांगावा विरोधकांनी सुरु केला आहे.
या मतदारसंघाचे मी प्रतिनिधीत्व करीत आहे, तोवर येथील एक कसपाटही मी बाहेर जाऊन देणार नाही. हा प्रकल्प म्हसवड येथेच होणार आहे, असे ठाम मत भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे. म्हसवड येथील एमआयडीसी रद्द झाल्याचे विरोधकांकडुन वारंवार सांगितले जात आहे.
यामुळे विरोधक जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करीत आहेत, असे सांगून आमदार गोरे म्हणाले, मी स्वत: व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हसवडच्या या प्रकल्पासाठी सतत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहोत. हा प्रकल्प म्हसवडऐवजी फलटण मतदारसंघात नेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे जोरदार प्रयत्न करीत आहेत.
त्यांना माझे एकच सांगणे आहे की, माझ्या मतदारसंघातील प्रकल्पच काय पण, एक साधे कसपाटही मी इतर ठिकाणी हलवु देणार नाही. मी जनतेच्या मताशी कधीही प्रतारणा होऊ देणार नाही. म्हसवडच्या जनतेनेही याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाब विचारावा, असे आवाहनही आमदार गोरे यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.