Pandharpur, 30 May : विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे भाजपकडून इच्छूक आहेत. गोरे यांना पक्षातील बड्या नावांशी स्पर्धा करावी लागत आहे. मात्र, शेखर गोरे यांच्या उमेदवारीवर आता जयकुमार गोरे यांनीच भाष्य केले आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सातारा-सांगली (Satara-Sangli) मतदारसंघामधून माझे बंधू शेखर गोरे यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्याच पद्धतीने धैर्यशील कदम, पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक व अन्य काही लोकांनी उमेदवारी मागितली आहे. मात्र, भाजप नेतृत्व जो निर्णय घेईल, तो माझा निर्णय असेल. दिलेला उमदेवार निवडून आणणे, ही माझी जबाबदारी असणार आहे.
शेखर गोरेंना दिलेल्या शब्दाचे काय?
दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी माण मतदारसंघातून शेखर गोरे हे इच्छुक होते. मात्र, जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासाठी शेखर गोरे यांनी माघार घेऊन जयकुमार गोरे यांना मदत केली होती. त्या वेळी त्यांना भाजपकडून आमदारकीचा शब्द दिल्याची चर्चा आहे, त्यामुळे शेखर गोरे यांना दिलेल्या शब्दाचे काय होणार, अशी चर्चा साताऱ्यात रंगली आहे.
महिला इच्छुकाबाबत...
सोलापूरमध्ये भाजप उमेदवारीसाठी महिला इच्छुकांचे नाव चर्चेत आहे, याबाबत गोरे म्हणाले, उमेदवार निवडीची प्रक्रिया ही आमची दिल्ली आणि मुंबईतील कोअर कमिटी करत असते. ज्या दिवशी भाजपकडून उमेदवार जाहीर होईल, त्या दिवसापासून माझे काम सुरू होईल. आमची पूर्वतयारी पक्की आहे. जिल्ह्यातील ६१६ पैकी ५१० ते ५२० मते आम्हाला (भाजपला) मिळतील, असा मला विश्वास वाटतो.
विरोधकांकडे किती मतदार राहतील, सांगता येत नाही
विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा, कुर्डूवाडी येथील अनेक हितचिंतक मतदार भाजपसोबत आहेत, त्यामुळे विरोधकांकडे शेवटपर्यंत किती मतदार राहतील, हे आताच सांगता येणार नाही. भाजप उमेदवार मोठ्या मतांच्या फरकांनी निवडून येईल, असा दावाही मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.
उदय सामंत माझे चांगले मित्र
शिवसेनेचे नेते उदय समांत हे माझे चांगले मित्र आहेत. आम्हा दोघांना आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते त्यांचा पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा पालकमंत्री आहे. तेथे भाजपला कमी निधी मिळतो, पण सोलापुरात भाजपचा पालकमंत्री असताना शिवसेनेला अधिक निधी दिला, असेही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.