Rajendra Raut : बार्शीच्या राजेंद्र राऊतांनी घेतला अर्ज : भाजप उमेदवारीचा सस्पेन्स कायम

Solapur Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी 54 अर्जांची विक्री झाली असून भाजपचे इच्छुक राजेंद्र राऊत यांनी चार अर्ज घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Rajendra Raut
Rajendra Raut Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 30 May : विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी शनिवारअखेर (ता. ३० मे) एकूण ५४ अर्जांची विक्री झाली आहे. त्या दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेससह इतर पक्षांच्या इच्छुकांचा समावेश आहे. सर्वांत महत्वाची घडामोड शनिवारी घडली असून भाजपचे प्रबळ इच्छूक असलेले बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी चार अर्ज घेतले आहेत. मात्र, भाजपच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे.

दुसरीकडे महायुतीमधील शिवसेनेचे मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या इच्छेनुसार सोलापूरची निवडणूक बिनविरोध होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पहिल्याच दिवशी महायुतीमधील शिवसेनेकडून रमेश बारसकर यांनी तीन, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून व अपक्ष बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे खंदे समर्थक नागेश अक्कलकोटे यांनी तीन अर्ज घेतले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी ही अर्ज नेले आहेत. यातील बारसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीमधील बेबनाव पुढे आणला आहे.

मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनीही अर्ज घेतले आहेत. मात्र त्यांनी अद्याप उमेदवारी अर्ज भरलेला नाही, त्यामुळे या पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajendra Raut
Satara-Sangli : भाजपला पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यातून पहिला दणका : शिवसेनेच्या बड्या नेत्याने भरला विधान परिषदेसाठी अर्ज

राऊतांचा अर्ज नेण्याचा अर्थ काय?

सर्वाधिक उत्सुकता असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून शनिवार अखेरपर्यंत सहा उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. यामध्ये भाजपकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शनिवारी चार अर्ज घेतले आहेत. मात्र, पक्षाकडून अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही, त्यामुळे भाजपच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे.

काँग्रेसची उमेदवारी कोणाला?

महाविकास आघाडीतील जागा वाटपानुसार सोलापूरची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. या पक्षाचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. ते स्वतः निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. तसेच, लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी सोलापूरची निवडणूक बिनविरेाध होऊ देणार नसल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलेले आहे, त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत काँग्रेसकडे केवळ चार मते आहेत.

Rajendra Raut
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या तोंडावर सामंतांनी सातारमधील शिवसेना-भाजप वादाची वात पेटवली : वाद घातक ठरण्याचा दिला इशारा...

सोलापूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाठी शनिवारपर्यंत घेतलेले पक्षनिहाय अर्ज

1) काँग्रेस पार्टी : ४

2) शिवसेना (शिंदे गट) : ५

३ राष्ट्रवादी काँग्रेस : १

४ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : २

५) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : 3

६) भाजप : ६

७) मनसे : 1

८) एआयएमआयएम : 1

9) राष्ट्रीय समाज पक्ष :1

१0) बहुजन समाज पार्टी :1

१1) संभाजी ब्रिगेड : 1

12) अपक्ष : २६

एकूण अर्ज विक्री : 54

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com