Vinay Kore - Ashok Mane .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hatkangale News: मानेंचा पक्ष ठरेना..? हातकणंगलेसाठी सगळ्यांचीच 'फिल्डिंग'; उमेदवारीचा घोळ वाढला

Rahul Gadkar

Hatkangale News : हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये उमेदवारीबद्दल चुरस निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्य शक्तीमध्ये हा मतदारसंघ मिळवण्यासाठी प्रचंड चढाओढ आहे. जागा वाटपात हा मतदारसंघ जनसुराज्य शक्तीला जाण्याची शक्यता आहे. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा 'जनसुराज्य'कडून अशोकराव माने यांनी लढवली होती.

मात्र, सध्या या जागेवर महायुतीतील सर्वच पक्ष दावा करत असल्याने अशोकराव माने सांगा कोणाचे? अशी विचारण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर आमदार विनय कोरे (Vinay Kore),माजी आमदार अमर महाडिक आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी असलेल्या जवळीकतेने हा सवाल आणखी गडद होत चालला आहे.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये देखील उमेदवारीवरून रस्सीखेच निर्माण झाली आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ जनसुराज्य शक्ती पक्षाला जाण्याची शक्यता आहे.

त्यांच्याकडे अशोकराव माने हे उमेदवार असू शकतात. कारण 2019 चे विधानसभा निवडणूक त्यांनी या मतदारसंघातून लढवली होती. यंदा या मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा डोळा आहे.

भाजपकडून (BJP) देखील अशोकराव माने यांचे नाव समोर येऊ शकते. माने यांचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांचे देखील जवळचे सहकारी आहेत. स्वतः माने हे शिरोळ तालुक्यातील असले तरी त्यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघात आपला वर्ग तयार केला.

जनसुराज्य शक्ती आणि महाडिक गट हाताशी धरून त्यांनी यापूर्वी निवडणूक लढवली आहे. इतकेच नव्हे तर इचलकरंजीची अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांची देखील त्यांना मदत होण्याची शक्यता आहे. पण आमदार आवाडे यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केल्यानंतर माने यांना मदत होईल की नाही याची साशकंता आहे.

शिवसेना शिंदे गट माजी आमदार गळाला लावण्याची शक्यता?

याच मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडे तगडा उमेदवार आयात करण्याच्या हालचालीत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिंनचेकर यांना गळ्याला लावण्याचा प्रयत्न करत आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मिनचेकर हे शिंदे गटात जाण्याचे चर्चा मतदारसंघात सुरू आहेत. त्यामुळे एकूण परिस्थिती पाहिली तर विधानसभा मतदारसंघात जग सुराज्य शक्ती की भाजपकडून माने हे निवडणूक लढवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT