Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी सरपंचाचा पंढरपूरमध्ये उपोषणस्थळी आत्महत्येचा प्रयत्न

Pandharpur hunger strike : उपोषणस्थळी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सरपंचाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Pandharpur hunger strike
Pandharpur hunger strikeSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 14 September : धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील धनगर समाज बांधवांकडून पंढरपूमध्ये उपोषण आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून धनगर समाजाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपोषणस्थळी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सरपंचाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अमोल देवकते असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. देवकाते हे माढा तालुक्यातील आलेगाव येथील सरपंच आहेत. एका लोकप्रतिनिधीनेच आरक्षणासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे धनगर समाज आरक्षणाच्या (Dhangar reservation) आंदोलनाची धग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

धनगर समाजाला एसटीतून देण्यात आलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी पंढरपूरमध्ये (Pandharpur) उपोषण आंदोलन सुरू आहे. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अमोल देवकाते हे पंढरपूरमध्ये आले होते. उपोषणस्थळी आल्यानंतर आंदोलनाला पाठिंबा देण्याचे भाषण हे देवकाते करत होते.

Pandharpur hunger strike
Rajan Patil : राजन पाटील सर्वपक्षीयांना ठरले भारी; विरोधानंतरही अनगर अप्पर तहसील सुरू करून दाखवले!

धनगर आरक्षण उपोषण आंदोनाला पाठिंबा देण्याचे भाषण करत असतानाच अमोल देवकाते यांनी विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या वेळी कार्यकर्त्यांनी तातडीने बाटली हिसकावून घेत देवकाते यांना बाजूला केले.

पोलिस आणि धनगर समाज बांधवांनी उपचारासाठी अमोल देवकाते यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. एका गावच्या सरपंचाने आरक्षणाच्या मुद्यावर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. देवकाते यांना पंढरपूरच्या रुग्णालयात तातडीने दाखल करून उपचारास प्रारंभ करण्यात आला आहे.

परिचारकांची भूमिका

दरम्यान, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि शेकापचे सांगोल्याचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. परिचारक आणि डॉ. देशमुख यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला होता.

Pandharpur hunger strike
Mahayuti Seat Allotment : महायुतीच्या तिकिटवाटपानंतर कुठलीही ब्रेकिंग मिळणार नाही; शिंदेंच्या मंत्र्याने केला दावा

सरकार आणि धनगर आरक्षण आंदोलकांमध्ये मध्यस्थी करणार का, असा सवाल केला. त्या वेळी मी काय आता आमदार नाही, असे सांगितले. पत्रकारांनी तुम्ही आमदारापेक्षा कमी नाहीत, असं म्हटलं असता त्यांनी ‘तसं नसतंय, प्रत्येकाला मर्यादा आहे. आपण आपली मर्यादा ओळखून वागलं पाहिजे, अशी भूमिका मांडली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com